कोपरगाव तालुका
आत्मा मालिकमध्ये प्रज्ञाशोध बक्षिस वितरण उत्साहात संपन्न
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील आत्मा मालिक शैक्षणिक संकुलाच्या वतीने सन 2013 पासून इयत्ता 2 री ते 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन करण्यात येत असून सन 2018-19 मधील परीक्षेचे बक्षिस वितरण नुकतेच मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या परीक्षेत इयत्ता 2 री व इयत्ता 10 वी मधील राज्यरावर प्रथम क्रमांक मिविलेल्या विद्यार्थ्यांना आश्रमाचे जितेंद्रानंद महाराज, राजनंद महाराज, ब्रम्हांडानंद महाराज, अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी यांचे हस्ते स्मृतिचिन्ह व रोख रक्कम बक्षिसे देवून गौरविण्यात आले आहे.
या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे इयत्ता 2 री ते इयत्ता वी अनुक्रमे जागृती भिंगारे, इंग्लिश मिडीयम गुरूकूल कोकमठाण, मिना गडाख, पद्म रसिक शहा स्कूल संगमनेर, हरिश गडाख पार्थ विद्यालय संगमनेर, श्रृतिका चत्तर जि. प. शाळा पळसखेड, तेजस्वी चव्हाण इंग्लिश मिडीयम स्कूल कोकमठाण, राहुल कोकरे, विजय गोर्डे, दिपक जाधव व केदार गवळी आदींचा समावेश आहे.
सदर प्रसंगी प्राचार्य निरंजन डांगे यांनी उपस्थितांना मार्ग दर्शन करताना सांगितले कि, या वर्षी या परिक्षेस राज्यभरातून 15 हजार विद्याथ्र्यांनी सहभाग घेतला होता. यापैकी 1847 विद्यार्थ्यांना राज्य, विभाग, जिल्हास्तरावर बक्षिसे देवून गौरविण्यात आले आहे. एकूण रक्कम रूपये 4 लाख 85 हजार रकमेचे रोख बक्षिसे वितरीत करण्यात आले. इयत्ता 2 री पासूनच प्रज्ञाशोध परीक्षा आयोजित करणारी आत्मा मालिक राज्यातील एकमेव संस्था आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक वर्ष 2019-20 मध्ये परीक्षेच्या स्वरूपात व बक्षिसामध्ये बदल करण्यात आलेला आहे. परीक्षेचे स्वरूप इयत्ता 5 वी, इ. 8 वी स्काॅलरशीप व इ. 10 वी एन.टी.एस.ई. या परीक्षांच्या अभ्यासक्रमावर आधारित राहतील. तर राज्यात प्रथम येणा-या इयत्तानिहाय विद्यार्थ्यांस लॅपटाॅप, द्वितीय क्रमांक मिळविणा-या विद्यार्थ्यांना सायकल याप्रमाणे वस्तूरूपी बक्षिसे राहणार असून एकूण 7 लाख 51 हजार एवढया रकमेची बक्षिसे देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले आहे.
या परीक्षेमध्ये राज्यस्तरावर प्रथम क्रमांक मिळविलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे इयत्ता 2 री ते इयत्ता वी अनुक्रमे जागृती भिंगारे, इंग्लिश मिडीयम गुरूकूल कोकमठाण, मिना गडाख, पद्म रसिक शहा स्कूल संगमनेर, हरिश गडाख पार्थ विद्यालय संगमनेर, श्रृतिका चत्तर जि. प. शाळा पळसखेड, तेजस्वी चव्हाण इंग्लिश मिडीयम स्कूल कोकमठाण, राहुल कोकरे, विजय गोर्डे, दिपक जाधव व केदार गवळी आत्मा मालिक माध्यमिक गुरूकूल कोकमठाण या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे.
त्यावेळी आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी म्हणाले की, आज स्पर्धा परीक्षांचे युग आहे. भविष्याचा विचार करूनच आजची शिक्षण पद्धती असणे आवश्यक आहे. म्हणून आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेच्या माध्यमातून इयत्ता 2 री पासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची सवय व्हावी त्यांचे महत्व समजावे या हेतूने आत्मा मालिक प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन केले जाते. या परीक्षेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून यश मिळवतील असा विश्वास त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.