जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

दरोड्याचा तयारीत असलेली टोळी पकडली,दरोडेखोर कोपरगावातील, गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येवला नाका परिसरात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने लपून बसलेली टोळी कोपरगाव शहर पोलिसांना आढळली असून त्यांनी तातडीने हालचाल करून टिळकनगर या उपनगरातील आरोपी ऋषिकेश सोमनाथ सावंत (वय-19),अविनाश अशोक भोपले (वय-22),रा.दत्तनगर,मयूर संजय सुपेकर (वय-24),रा,मोहिनीराजनगर, कोपरगाव व अन्य दोन अनोळखी इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव शहर पोलीस रात्री सव्वा बारा वाजे नंतर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपली गस्त घालत असताना त्यांना कोपरगावच्या उत्तरेस येवला नाका या ठिकाणी वरील आरोपी संशयित रित्या फिरताना आढळले त्यांच्याकडे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला हे त्यांच्या ध्यानी येताच त्यांनी पळण्यास प्रारंभ केल्याने पोलिसांना आणखी संशय वाढला.पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना लगेच ताब्यात घेतले व चौकशी केली असता हे आरोपी दरोडा घालण्याच्या व रस्ता लूट करण्याच्या उद्देशाने एकत्र तयारी करून आलेले दिसले त्यांच्याकडे चालू,कोयता,दोन लाकडी दांडके, मिरची पावडर व एक दुचाकी आढळून आली आहे.त्यांच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत नागरे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close