कोपरगाव तालुका
कोपरगाव विधानसभेची जागा काँग्रेसला द्या-अशोक खांबेकर यांची मागणी
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी)
कोपरगाव विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा सलग तीनदा मानहानीकारक पराभव झाल्याने हि जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडावी अशी महत्वपूर्ण मागणी साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना केली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने आज दुपारी महाराष्ट्रासह दोन राज्यांच्या निवडणूका जाहीर केल्या असून आता या लगिनघाईसाठी सर्वच राजकीय पक्ष व त्यांचे सर्व कार्यकर्ते सरसावले असून आता पळे-पळे कोण पुढे पळेची स्पर्धा सुरु झाली आहे.भाजप-शिवसेनेची अद्याप अधिकृत युती जाहीर झालेली नाही.तरीही हे सत्ताधारी दोन्ही पक्ष त्या बाबत अद्यापही आशावादी असून चोवीस तासात हि युती जाहीर होऊ शकते.तर काँग्रेस राष्ट्रवादीने या आधीच आपली आघाडी व तिचे जागा वाटप जाहीर केले होते.मात्र अद्याप या जागा वाटपात कोपरगाव विधानसभेची जागा नेमकी कोणाच्या वाट्याला जाणार या बाबत कार्यकर्त्यांत संभ्रम आहे.
राष्ट्रवादी 10 जून 1999 रोजी स्थापन झाल्या नंतर हि जागा राष्ट्रवादीच्या वाट्याला गेली होती कारण त्यावेळी आ. शंकरराव कोल्हे यांचे कडे ती जागा प्रस्तापित आमदार म्हणून त्यांच्या वाट्याला आली होती ती त्यांनी नंतर 2004 च्या निवडणुकीत मात्र हि जागा आ. अशोक काळे यांनी शिवसेनेत प्रवेश करून राखली होती.त्या नंतर 2009 च्या निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती झाली होती.मात्र 2014 च्या निवडणुकीत मात्र माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली व आपल्या स्नुषा स्नेहलता कोल्हे याना थेट भाजपात जाण्याचा मार्ग खुला करून देऊन आपला सत्तेचा सारीपाट मोकळा करून घेतला.
कोपरगावात सलग तीन वेळा हि जागा राष्ट्रवादीकडून पराभूत झाली आहे.गतवेळेस या जागेवर काँग्रेसने स्थानिक आघाडीचा उमेदवार देऊन जवळपास वीस हजारांची बेगमी केली होती.तर राष्ट्रवादीला आपले अनामत वाचवता आली नव्हती त्यामुळे या जागेवर काँग्रेसचा हक्क आहे.
आता यावेळी काँग्रेस व राष्ट्रवादीची पार दाणादाण झाली असून त्यांचे प्रमुख मोहरेच भाजपच्या गळाला एकापाठोपाठ लागले आहेत.काँग्रेसची वेगळी अवस्था नव्हती.त्यामुळे सलग तीन वेळा हि जागा राष्ट्रवादीकडून पराभूत झाली आहे.गतवेळेस या जागेवर काँग्रेसने स्थानिक आघाडीचा उमेदवार देऊन जवळपास वीस हजारांची बेगमी केली होती.तर राष्ट्रवादीला आपले अनामत वाचवता आली नव्हती त्यामुळे हि जागा आता आघाडीने काँग्रेसला द्यावी अशी मागणी अशोक खांबेकर यांनी शेवटी केली आहे.