गुन्हे विषयक
पाच लाखांसाठी विविहित महिलेचा छळ,कोपरगावात सहा जणांवर गुन्हा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील तळेगाव मळे येथे माहेर असलेली व वैजापूर येथे सासर असलेल्या महिलेने आपल्या माहेराहून कर्ज फेडण्यासाठी पाच लाख रुपये आणावे यासाठी नवरा सचिन बाळनाथ जोरे,सासरा बाळनाथ निवृत्ती जोरे,सासू मुक्ताबाई बाळनाथ जोरे,दीर प्रवीण बाळनाथ जोरे,नणंद अर्चना अजय इंगळे,नंदावी अजय नाना इंगळे सर्व रा. वैजापूर आदी आरोपींनीं संगनमत करून वेळोवेळी शिवीगाळ,मारहाण व दमदाटी करून उपाशी पोटी ठेऊन आपल्याला घराबाहेर कंधून दिल्याचा गुन्हा फिर्यादी महिला माई सचिन जोरे हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेचे दि.२७ मे २०१६ रोजी तिच्या वडिलांनी व अन्य नातेवाईकांनी वाजत-गाजत लग्न लावून दिले नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर नवरा सचिन बाळनाथ जोरे,याने आपले रंग उधळायला सुरुवात केली त्यातून हि दुर्घटना घडली आहे.त्या गुन्हा नुकताच तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
सदर सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी महिलेचे दि.२७ मे २०१६ रोजी तिच्या वडिलांनी व अन्य नातेवाईकांनी वाजत-गाजत लग्न लावून दिले नव्या नवलाईचे नऊ दिवस गेल्यावर नवरा सचिन बाळनाथ जोरे,याने आपले रंग उधळायला सुरुवात केली त्याला सासरा बाळनाथ निवृत्ती जोरे,सासू मुक्ताबाई बाळनाथ जोरे,दीर प्रवीण बाळनाथ जोरे,नणंद अर्चना अजय इंगळे,नंदावी अजय नाना इंगळे सर्व रा. वैजापूर आदी आरोपींनीं संगनमत करून साथ दिली असून वेळोवेळी शिवीगाळ,मारहाण व दमदाटी करून उपाशी पोटी ठेऊन आपल्याला घराबाहेर काढून दिल्याचा गुन्हा फिर्यादी महिला माई जोरे हिने दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी या महिलेला प्रथम समुपदेशन केंद्र नगर येथे पाठवले व त्या नंतर त्यांनी समुपदेशन केल्यानंतरही या महिला आपल्या म्हणण्यावर ठाम राहिली असल्याने अखेर कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.६३/२०२१ भा.द.वि.कलम ४९८ (अ),३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे सहा आरोपीविरुद्ध काल सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली हे.कॉ.आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.