जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

सावळीविहिर बु.नजीक अपघात,दुचाकीस्वार जागीच ठार

जाहिरात-9423439946

जनशक्तीं न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राहाता तालुक्यातील सावळीविहिर ग्रामपंचायत हद्दीतील डॉ.दोडीया हॉस्पिटल नजीक असलेल्या महावीर मार्केट समोर नगर-मनमाड राज्य मार्गावर आज दुपारी २.४५ वाजेच्या सुमारास एक राजस्थानातील आयशर कंटेनर (क्रं.आर.जे.१४ जी.जे. २६८७) याला दुचाकी स्वाराने आपल्या होंडा कंपनीच्या दुचाकीने (क्रं.एम.एच.१७ बी.के.८१३२) ने ओलांडण्याच्या प्रयत्नांत झालेल्या अपघातात दुचाकीस्वार रोशन राजेंद्र गुजर (वय-३२) रा.राजगुरूनगर शिर्डी हा जागीच ठार झाला आहे.त्या सोबत असलेल्या बहिणीचा आक्रांत पाहून अनेकांचे मन हेलावले आहे.दुर्घटनेनंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.

दरम्यान या घटनेला नगर-मनमाड हा रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अनेकांचे बळी जात असून या प्रकरणी हा रस्ता दुरुस्त केला नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या परिसरात हा तिसरा मोठा अपघात असल्याचे स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”रोशन गुजर हा आपल्या कुटुंबियांना घेऊन कोपरगाव कडून शिर्डीकडे जात असताना शिर्डी नजीक असललेल्या प्रचंड खड्ड्यांच्या भीतीने रस्त्याच्या कडेने गव्हाचे बाचके घेऊन एका वरील क्रंमांकाच्या राजस्थानातील कोपरगाव कडून शिर्डीच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला ओलांडत असताना त्याला कंटेनरच्या दोन्ही चाकाच्या मधील भागाचा गव्हाच्या बाचक्यास धक्का लागून दुचाकीवर हा दोन्ही चाकाच्या मध्ये ओढला गेला व त्यांना काही कळायच्या आत तो मागील चाकाच्या खाली सापडला असून त्याचा डावा हात व छातीचा डावा भाग हा मागील चाकाच्या खाली सापडला जाऊन तो काही फूट फरफटत गेला हा अपघात काही नागरिकांनी आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे.त्यातील काहींनी आपल्या दुचाकीच्या सहाय्याने पळून जाण्याच्या प्रयत्नात असललेल्या कंटेनर चालकास काही तरुणांनी आपल्या अन्य दुचाकी गाड्या आडव्या घालून अडविले व त्या ठिकाणाहून नागरिकांची नजर चुकवून तो झाला आहे.या घटनेची खबर काही नागरिकांनी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांना कळविली तर काही नागरिकांनी रुग्ण वाहिकेस पाचारण केले तो पर्यंत सदर इसम गतप्राण झाला असल्याचे दिसून आले आहे.सदर घटनेच्या ठिकाणी पिवळ्या रंगाचा पंजाबी पेहराव केलेल्या महिलेची पोलिसांना विचारणा केली असता ती मयताची बहीण असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.तिला अपघातग्रस्त इसमाचे नाव विसरता तिने त्याचे नाव रोशन राजेंद्र गुजर असल्याचे सांगितले आहे.या घटनेला नगर-मनमाड हा रस्ता मोठ्या प्रमाणावर नादुरुस्त झाल्याचे समोर आले आहे.त्यामुळे अनेकांचे बळी जात असून या प्रकरणी हा रस्ता दुरुस्त केला नाही तर आंदोलन छेडले जाईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.या परिसरात हा तिसरा मोठा अपघात असल्याचे स्थानिक नागरिकांनी दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close