गुन्हे विषयक
कोपरगाव तालुक्यात एकावर ऍट्रॉसिटी दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील ब्राह्मणगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेला आरोपी राजेंद्र नामदेव शिंदे या शेतकऱ्याने फिर्यादी हा शेतात कामास येत नाही या कारणावरून फिर्यादीला जातीवाचक शिवीगाळ केली आहे.या कारणावरून फिर्यादी ज्ञानदेव शिवाजी ठाकरे (वय-३२) याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
फिर्यादी ज्ञानदेव ठाकरे हा ब्राम्हणगाव येथील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतात काम करतो मात्र काही कारणांनी तो शेतकरी शिंदे यांचेकडे गेला नाही याचा राग आरोपी शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आला त्यातून त्याने फिर्यादी ज्ञानदेव ठाकरे हे आपल्या दुसऱ्या भाजी आणण्याच्या कामासाठी गेला असता जातीवाचक शिवीगाळ केल्याने हा अनर्थ झाला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी ज्ञानदेव ठाकरे हा ब्राम्हणगाव येथील शेतकरी राजेंद्र शिंदे यांच्या शेतात काम करतो मात्र काही कारणांनी तो शेतकरी शिंदे यांचेकडे गेला नाही याचा राग आरोपी शेतकरी राजेंद्र शिंदे यांना आला त्यातून त्याने फिर्यादी ज्ञानदेव ठाकरे हे आपल्या दुसऱ्या भाजी आणण्याच्या कामासाठी दि.०७ जानेवारी रोजी सायंकाळी ७.४५ वाजेच्या सुमारास माउली मेडिकल समोरून जात असताना फिर्यादी शिवी हासडून म्हणाला की,”तू माझ्या शेतात कामास येत नाहीस,असे म्हणून लई माजलेय… असे म्हणून जातीवाचक शिवीगाळ केली आहे.व डाव्या कानाखाली चापट मारली आहे.अशा फिर्यादीवरुन पोलिसानी आपल्या दप्तरी गुन्हा दाखल करून घेतला आहे.घटनास्थळी शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१३-२०२१ भा.द.वि.कलम ३२३,५०४,सह अनु.जाती जमाती कलम २०१५ चे कलम ३(१),(आर.),(एस.),३,(२),(व्ही.ए.) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास जिल्हा पोलीस अधीक्षक श्री पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.