जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलीस पळविले,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील उक्कडगाव येथील अल्पवयीन मुलीस कोणातरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी दि.२० डिसेंबर रोजी सायंकाळी आठ ते रात्री अकरा वाजेच्या दरम्यान पळवून नेले असल्याची फिर्याद आज कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या मुलीच्या मजुरी करणाऱ्या आईने दाखल केल्याने उक्कडगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

शिर्डीतील जवळपास दोनशेच्यावर व्यक्ती गायब होण्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून पोलिसांना फैलावर घेतल्याची घटना ताजी असताना या घटना लक्षवेधी ठरत आहेत.उककडगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील घटना अशीच असून याकडे परिसराचे लक्ष वेधले आहे.

कोपरगाव तालुक्यात अल्पवयीन मुली पळवून नेण्याचा तक्रारीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.शिर्डीतील जवळपास दोनशेच्यावर व्यक्ती गायब होण्याची गंभीर दखल मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतली असून पोलिसांना फैलावर घेतल्याची घटना ताजी असताना या घटना लक्षवेधी ठरत आहेत.उककडगाव येथील ग्रामपंचायत हद्दीतील घटना अशीच असून याकडे परिसराचे लक्ष वेधले आहे.या प्रकरणी गायब मुलीच्या आईने (वय-३५) धंदा मोलमजुरी यांनी आज कोपरगाव तालुक्यात या बाबत गुन्हा दाखल केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की,”आपली अल्पवयीन मुलगी हिस कोणीतरी ज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी पळवून नेले आहे.

याबाबत कोपरगाव तालुका पोलिसात गु.क्रं.५६०/२०२० भा.द.वि कलम ३६३ प्रमाणे अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर.एम.म्हस्के हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close