गुन्हे विषयक
अल्पवयीन मुलीचा विनयभंग,तिघांविरुद्ध गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील येसगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या अल्पवयीन मुलीचा त्याच गावातील आरोपी दिलीप कदम,दीपक दिलीप कदम,सचिन दिलीप कदम यांनी,”दुकानावर येणाऱ्या लोकांना काहीही सांगता” असा आरोप करून तिचा लाकडी दांडक्याने मारहाण करून विनयभंग केला असल्याची फिर्याद या अल्पवयीन मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने येसगाव परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपीनीं नुकतेच फिर्यादी अल्पवयीन मुलीचे घरासमोर लाकडी दांडके घेऊन येऊन त्यानी फिर्यादी मुलीस व तिचे आईस म्हणाले की,”तुम्ही आमच्या दुकानात येणाऱ्या लोकांना काही पण सांगता “असे म्हणून फिर्यादी अल्पवयीन मुलीस व तिच्या आईस लाकडी दांडक्याने मारहाण करून आरोपी दीपक कदम याने फिर्यादी मुलीस तिची छाती दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,येसगाव ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी अल्पवयीन मुलगी व तिचे आई वडील व अन्य कुटुंब रहाते.आरोपींचे जवळच दुकान आहे.आरोपी हे नुकतेच फिर्यादी अल्पवयीन मुलीचे घरासमोर लाकडी दांडके घेऊन येऊन त्यानी फिर्यादी मुलीस व तिचे आईस म्हणाले की,”तुम्ही आमच्या दुकानात येणाऱ्या लोकांना काही पण सांगता “असे म्हणून फिर्यादी अल्पवयीन मुलीस व तिच्या आईस लाकडी दांडक्याने मारहाण करून आरोपी दीपक कदम याने फिर्यादी मुलीस तिची छाती दाबून तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले आहे.व फिर्यादीचे गळ्यास ओरबाडून जखम केली आहे.फिर्यादीची आई सोडविण्यास आली असता तिला लाकडी दांडक्याने मारहाण करून वाईट व अर्वाच्च शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी मुलीने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी आरोपी दिलीप कदम,दीपक दिलीप कदम,सचिन दिलीप कदम यांचे विरुद्ध गु.र.क्रं.भा.द.वि.कलम५४७,/२०२०,३५४(अ),३२४,३२३,५०४,५०६,३४,व लैंगिक अपराधापासून बाल संरक्षक अधिनियम सण-२०१२चा अधिनियम कायदा कलम ८,१२ व अनू. जाती./जमाती अत्याचार प्रतिबंधक सुधारणा अधि.२०१५ चे कलम ३(१),डब्ल्यू(आय)(३,(१),(आर)(एस)३,(२)(व्ही.ए) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस अधीक्षक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शिर्डी विभागीय पोलीस अधिकारी संजय सातव हे करीत आहेत.