जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

शिरसगाव येथून दुचाकीची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव येथील रहिवाशी इरफान गुलाब पटेल (वय-२७) यांच्या घरासमोर उभी करून ठेवलेली ३५ हजार रुपये किमतीची लाल रंगाची हिरो कंपनीची आय स्मार्ट हि दुचाकी क्रं.एम.एच.१७ बी.एफ.६९८४ हि अज्ञात चोरट्याने अज्ञात कारणासाठी लबाडीच्या हेतून पळवून नेली असल्याची फिर्याद कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे.त्यामुळे दुचाकीस्वारात खळबळ उडाली आहे.

आपण आपल्या कुटूंबासमवेत शिरसगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत राहतो.आपण बारामती ऍग्रो कंपनीत नोकरी करत असून ती आपण आपल्या खाजगी कामासाठी वापरतो.मात्र आपण हि दुचाकी दि.२६ नोव्हेम्बर रोजी आपल्या घरासमोर रात्री नऊ वाजता लावली व आपण झोपी गेलो असता मध्यरात्री बारा वाजता लघुशंकेसाठी उठलो असताना आपली दुचाकी आपल्याला घरासमोर उभीच असलेली दिसली नाही.

या प्रकरणी फिर्यादी इरफान पटेल यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,आपण आपल्या कुटूंबासमवेत शिरसगाव येथील ग्रामपंचायत हद्दीत राहतो.आपण बारामती ऍग्रो कंपनीत नोकरी करत असून ती आपण आपल्या खाजगी कामासाठी वापरतो.मात्र आपण हि दुचाकी दि.२६ नोव्हेम्बर रोजी आपल्या घरासमोर रात्री नऊ वाजता लावली व आपण झोपी गेलो असता मध्यरात्री बारा वाजता लघुशंकेसाठी उठलो असताना आपली दुचाकी आपल्याला घरासमोर उभीच असलेली दिसली नाही.अज्ञात चोरट्यानी आपल्या संमती शिवाय चोरून नेली आहे.तिचा घर व परिसरात शोध घेऊनही ती मिळून आली नाही.

या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गु.र.क्रं.५४४/२०२० भा.द.वि.कलम ३७९ अन्वये अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार संजय पवार हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close