जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात गोमांसाची राजरोस विक्री,पालिकेची धाड !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रातिनिधी)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देश आणि राज्यात सर्वत्र संचारबंदीचे वारे वाहत असताना कोपरगावात मात्र गोवंश मांसाची दुचाकीच्या पेटीत घालून घरोघरी विक्री चालू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहरातील नागरिकांनी या बाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

कोपरगावात पालिका हद्दीत संजयनगर भागात काही प्राण्यांची हाडे मिळून आली असून पालिका अधिकाऱ्यांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.तथापि अद्याप जप्त केलेला ऐवजाची पशु संवर्धन विभागाचे पशुवैद्यक अधिकारी यांचे कडून अधिकृत तपासणी केली जाणार असणार आहे.त्यांनतर दंडात्मक कारवाई निश्चित केली जाणार आहे-सुनील गोर्डे, उपमुख्याधिकारी,कोपरगाव नगरपरिषद.

महाराष्ट्रात आजपासून २ मार्च २०१५ गोवंश हत्या बंदी कायदा लागू करण्‍यात आला आहे.तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या कायद्यावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे ‘गोहत्या’ हा दंडनीय अपराध मानला जात आहे.गोहत्या करणार्‍या गुन्हेगाराला कठोर शिक्षा करण्याची तरतूद या कायद्यात आहे. गाय ही हिंदू धर्म आणि संस्कृतीचे प्रतिक मानली जाते.राज्यात भाजपचे सरकार सत्तेत आल्या-आल्या त्यांनी गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी केली होती.आता राज्यात महाआघाडीचे सरकार सहा महिण्यापूर्वी स्थापन झाले आहे.राज्यात अध्या कोरोना विषाणूंचा प्रकोप सुरु आहे.राज्यात संचारबंदी लागू असल्याने नागरिकांना घराबाहेर पाडण्यास सक्त मनाई आहे.अशातच कोपरगाव शहरात काही नागरिक मात्र आपल्या आर्थिक फायद्यासाठी गोवंशाची हत्या करताना दिसत आहे.व सदरचे मांस भ्रमणध्वनिवरून मागणी नोंदवून आपल्या दुचाकीचा वापर करत काळ्या प्लास्टिकच्या पिशवीतून घरोघर पोहच करण्याचे प्रताप सुरु आहे.सध्या कोरोना प्रकोपामुळे या अवैध गोमांस विक्री करणाऱ्यांना जास्तीचा फायदा होत आहे.याबाबत पोलिसही अनभिज्ञ दिसत आहे.

हि कारवाई कोपरगाव नगरपरिषद अधिकाऱ्यांनी केली असून त्यांनी अद्याप फिर्यादी दिलेली नाही,फिर्याद दिल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे ते पोलिसांचे कामच आहे-राकेश मानगावकर,पोलीस निरीक्षक,कोपरगाव शहर पोलीस ठाणे.

गत दोन वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या नाकाखाली एका महिला मुख्याधिकाऱ्यांच्या कालखंडात हा उद्योग भरभराटीला आला होता.ऐन महाशिवरात्रीच्या दिवशी हा उद्योग नगर येथील स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकून उघड केला होता.त्या नंतर संजयनगर परिसरात दोनतीन वेळेस धड टाकूनही येथील अवैध गोवंश हत्या थांबली नव्हती.आज सकाळी कोपरगाव नगरपरिषदेच्या अधिकाऱ्यांनी याच ठिकाणी पुन्हा एकदा या ठिकाणी धाड टाकून पुन्हा एकदा आक्षेपार्ह चीजवस्तू जप्त केल्याची माहिती हाती आली आहे.त्याची पशुवैद्यकांकडून तपासणी करण्याचे काम अद्याप सुरु आहे.त्यांनतर खरी वस्तुस्थिती उघड होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close