जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

..या पालिकेची निर्जंतुकीकरण कक्ष काढण्यास टाळाटाळ !

जाहिरात-9423439946
संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगावसह देशभरात निर्जंतुकीकरण कक्ष हे मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे शासनाने जाहीर करून व ते तातडीने काढून टाकण्याचे आदेश देऊन आता दहा दिवसांचा कालावधी उलटूनही त्यावर काही राजकीय पक्षाच्या नेत्यांची छबी असलेले निर्जंतुकीकरण कक्ष काढण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र कोपरगाव शहरात दिसून येत आहे.त्यामुळे पालिका सापत्नपणाची वागणूक देत असल्याची चर्चा विविध पक्षांच्या राजकीय कार्यकर्त्यांत आता रंगू लागली आहे.

सॅनिटायझर फवारणी अंगावर घेणे आरोग्यसाठी अपायकारक आहे. ज्या संघटनांनी निर्जंतुकीकरण बोगदे, फवारे तयार केले. त्यांनी कुठल्याही प्रकारचे प्रशिक्षण घेतलेे नव्हते.त्या अनुशंगाने केंद्र सरकारच्या पाठोपाठ राज्य सरकारने आदेश काढल्या नंतर लावलेले निर्जंतुकीकरण फवारे तातडीने काढण्यात आले मात्र कोपरगावात मात्र चौका-चौकात लागलेले निर्जतुकीकरण फवारे अद्याप कारवाईच्या प्रतीक्षेत आहेत.

देशभरात कोरोनाने आपली दहशत पसरवली असताना त्यावर अद्याप उपाय नसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.या कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नागरिकांना अत्यावश्यक सेवा पुरविणार्‍या पोलिस कर्मचार्‍यासाठी काही स्थानिक सामाजिक संघटनेने किंवा विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी पुढाकार घेत निर्जंतुकीकरण पोलिस वाहन,पोलिस अधीक्षक कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय,तहसील,पंचायत समिती कार्यालये व ग्रामीण भागातील ग्रामपंचायती आदींनी सामाजिक संघटनेच्या माध्यमातुन देशी गावरान तंत्रज्ञान वापरून शेतात फवारणीसाठी वापण्यात येणार्‍या नोझल,पाईप,बॅटरी व अन्य साहित्याच्या एकत्रिकरणातून अल्प दरात निर्जंतुकीकरण बोगदे तयार केले होते. यात निर्जंतुकीकरणासाठी अल्कोहोल,क्लोरीण,सोडीयम हायपोक्लोराईडचा वापर केला जात होता.कोपरगाव नगरपरिषद त्याला अपवाद नव्हती.मात्र या बोगद्याचे सार्वत्रीकरण पाहिल्यावर हे बोगदे मानवी आरोग्यास अपायकारक असल्याचे सरकारला जाहीर करावे लागले आहे.विशेष म्हणजे हे बोगदे म्हणजे नेत्यांना आपली छबी मिरवून घेण्याची मोठी संधी वाटून अनेकांनी त्याचा अचूक वापर केला होता.त्यावर उपयोगीतेपेक्षा जाहिरातच शिसारी आणणारी ठरली होती.त्यावर कोरोना संसर्गाचा धोका कोरोना बाधित व्यक्तीच्या संपर्कातून होतो.फक्त निर्जंतुकीकरण कक्षात जाऊन हा धोका टळणार नाही.कोरोना हवेतून पसरत नाही त्यामुळे हवेत फवारणीचा करून उपयोग नाही तर साबणाने वारंवार हाथ धुणे आवश्यक असल्याने कोरोनाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्याबरोबरच संपुर्ण देशात वापरण्यात येणार्‍या अशा प्रकारच्या निर्जंतुकीकरण फवारणीला जागतिक आरोग्य संघटनेने असुरक्षित असल्याचे स्पष्ट केले असुन लोकांना हॅन्ड वॉश करण्यावर भर देण्याच्या सूचना ही केल्या आहे.त्यामुळे हे बोगदे तातडीने काढून घेण्याचे आदेश दहा दिवसांपूर्वी केले होते.मात्र कोपरगाव नगरपरिषदेने काही नेत्यांचे बोगदे अगदी घाईने हटवले मात्र काहींवर मेहेरबान होऊन ते अद्याप तसेच ठेवलेले आढळून येत असल्याने ज्यांचे बोगदे हटवले त्यांच्या पोटात आता खुप खोलवर दुखत असल्याने कोपरगाव पालिकेने उर्वरित बोगदे त्वरीत काढून घ्यावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे.कोपरगाव बस स्थानकाच्या नजीक डॉ.आंबेडकर चौकात अद्यापही असे बोगदे ठेवलेले आढळतात.आता पालिका नेमकी कोणती कारवाई करते की पुन्हा या नेत्यांवर मेहेरबान होते ते लवकरच कळणार आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close