गुन्हे विषयक
महिलेच्या डोळ्यात मिरची पूड टाकून १.२० लाखांचा ऐवज लंपास?

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी महिला आपल्या बाळाला घेऊन बसलेली असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून घरातील दिवाण मधील सोन्याचे दागिने व त्यांच्या गळ्यातील,कानातील सोन्याचे किडुक-मिडूक घेऊन जवळपास ०१ लाख २० हजार रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला असल्याचा गुन्हा आरती गणेश शिंदे,(वय-३० वर्षे) यांनी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात केला आहे.त्यामुळे धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

सदर महिलेचे पती गणेश शिंदे आणि सासरे हे गावात गेले असताना दबा धरून संधीच्या शोधात बसलेले चोरट्यांनी संधी साधत महिलेच्या मागील बाजूने डोळ्यात मिरची सदृश पावडर टाकून त्यांना काही पाहता येणार नाही आणि चोरटे कोण आहेत हेही समजणार नाही याची खबरदारी घेऊन माझे मुलाचे कानातील बाळया व दिवाणमध्ये ठेवलेले सासुचे मंगळसुञ असे चोरुन नेलें आहे.त्यात 15 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजणाचे सोन्याचे कर्णफुले,5 हजार रुपये किंमतीचे 1.5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या बाळया,1लाख रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाची सोन्याचे मणी मंगळसुत्र असा एकूण 01 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.
कोपरगाव तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे.परिणामस्वरूप त्याचे दूरगामी परिणाम आता दिसू लागले आहे.कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्या काही नव्या नाही.कोपरगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही महिन्यांत चोऱ्या,घरफोड्या आणि लुटमारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून ही परिस्थितीत चिंताजनक बनली आहे.भरदिवसा महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणे,बंद घरे आणि दुकाने फोडणे,तसेच समृद्धी महामार्ग व ग्रामीण भागात हत्यारांचा धाक दाखवून दरोडे टाकण्याच्या वाढत्या प्रकारांमुळे स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर भीतीचे वातावरण पसरले आहे.कोपरगाव तालुक्यातील धोत्रे ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असलेली महिला आरती गणेश शिंदे ही व या महिलेचे कुटुंबीय सासरे नवनाथ विठठल शिंदे,सासु शोभा नवनाथ शिंदे,पती गणेश नवनाथ शिंदे व माझा लहान मुलगा असे एकञ राहावयास आहे.हे सर्व जण आम्ही शेती व्यवसाय करुन कुटुंब चालवत आहे.अशा स्थितीत आज सकाळी ०९ वाजता सदर महिलेचे पती गणेश शिंदे आणि सासरे हे गावात गेले असताना दबा धरून संधीच्या शोधात बसलेले चोरट्यांनी संधी साधत महिलेच्या मागील बाजूने डोळ्यात मिरची सदृश पावडर टाकून त्यांना काही पाहता येणार नाही आणि चोरटे कोण आहेत हेही समजणार नाही याची खबरदारी घेऊन माझे मुलाचे कानातील बाळया व दिवाणमध्ये ठेवलेले सासुचे मंगळसुञ असे चोरुन नेलें आहे.त्यात 15 हजार रुपये किमतीचे 3 ग्रॅम वजणाचे सोन्याचे कर्णफुले,5 हजार रुपये किंमतीचे 1.5 ग्रॅम वजनाचे कानातील सोन्याच्या बाळया,1लाख रुपये किंमतीचे 2 तोळे वजनाची सोन्याचे मणी मंगळसुत्र असा एकूण 01 लाख 20 हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे धोत्रे आणि परिसरात खळबळ उडाली आहे.दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचेसह सहाय्यक पोलिस निरीक्षक धर्मसिंग सुंदर्डे आदींनी भेट दिली आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यातफिर्यादी यांनी गुन्हा क्रमांक 449/2026 भारतीय न्याय संहिता कायदा 2023 चे कलम 309(6) प्रमाणे अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल अंबादास वाघ करत आहेत.



