गुन्हे विषयक
शहरात गावठी कट्टा,विद्यार्थी आरोपी गजाआड ?

न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव नजीक असलेल्या संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे पार्किंगमध्ये एक अकरा हजार रुपये किमतीच्या गावठी पिस्तुलाचा वापर करून विद्यार्थी आणि समाजात दहशत निर्माण करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कोपरगाव शहर पोलिसांनी मुसक्या आवळल्या असून त्याला अटक केली आहे.त्यामुळे कोपरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव दामले यांनी याबाबत अधिकची चौकशी केली असता सदर पिस्तुल हे हुबेहूब पिस्तुलासारखे दिसणारे असून ते लायटर असल्याची माहिती उघड झाली आहे.त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.मात्र हिसंक हिंदी सिनेमे,मालिका,रिल्स पाहून नवीन पिढी त्याकडे आकर्षित होत असून त्यामुळे आगामी काळात समाजापुढे आणि पालकांपुढे काय वाढून ठेवले आहे याची या निमित्ताने चुणूक दिसून आली आहे.मात्र तरुण जुन्या एका गुन्ह्यात पोलिसांना हवा असल्याने त्यांना या निमित्ताने आयती शिकार सापडली असल्याचे बोलले जात आहे.”आ बैल,मुझे मार” म्हणतात ते यालाच.
कोपरगाव तालुक्यात अवैध आणि गावठी कट्ट्यांचा सुळसुळाट वाढल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये आणि व्यापारी वर्गात अत्यंत चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव आणि आसपासच्या परिसरात गेल्या काही काळात वाळू,रेशन,अवैध व्यवसाय आदी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणांकडून अवैध हत्यारे बाळगण्याचे आणि दहशत माजवण्याचे प्रकार समोर आले आहेत.मध्य प्रदेश,बिहार किंवा इतर राज्यांतून १० ते २० हजार रुपयांच्या अत्यंत कमी किमतीत ही गावठी पिस्तुले आणि जिवंत काडतुसे छुप्या मार्गाने कोपरगाव व येवला परिसरात पोहोचवली जातात.सोशल मीडियावरील रिल्स किंवा वर्चस्व वादातून तरुण मुलांमध्ये अशा शस्त्रांचा वापर करून दहशत निर्माण करण्याची फॅशन वाढताना दिसत आहे.काही दिवसांपूर्वीच कोपरगाव शहरातील धारणगाव रोड परिसरात धारदार हत्यारांनी वाहनांची तोडफोड करत दहशत माजवल्याची घटना घडली होती,ज्यानंतर पोलिसांनी आरोपींची शहरातून धिंड काढली होती.विधानसेभेपूर्वी कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे समोर नाकाखाली राजकीय पक्षांच्या आणि नेत्यांचा वरदहस्त असलेल्या काही गुंडांनी एकमेकावर गोळीबार करून शहरात दहशत माजवली होती.त्यात रेशन घोटाळ्यातील काही आरोपी होते.काहींनी तर लोकप्रतिनिधींचे वाढदिवसाचे बॅनर लावून आपली निष्ठा जगजाहीर केली होती.त्यामुळे हे प्रकार कमी होण्याची शक्यता कमी दिसत असून वर्तमानात याची अनुभूती आली आहे.यातील आरोपी नाथप्रसाद ओमकार सोनुले (वय २१ वर्षे) रा.काले मळा,कोपरगाव हा संजीवनी अभियांत्रिकी महाविद्यालयाचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी असल्याची माहिती हाती आली आहे.त्याचेकडे विनापरवाना बेकायदेशीररित्या महाविद्यालय आणि समाजात दहशत करण्याचे उद्देशाने एक गावठी कट्टा व राऊंड तसेच हुबेहुब पिस्टल सारखे दिसणारे लायटर असा एकुण ११ हजार रुपये किंमतीच्या मुद्देमालासह मिळुन आला आहे.

दरम्यान त्याचे विरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात संजीवनी अभीयांत्रिकी महाविद्यालयातील सुरक्षा अधिकारी सुनिल केशव भामरे (वय-४५ वर्षे) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात क्रमांक ५४६/२०२६ शस्त्र अधिनीयम १९५९ चे कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.घटनेने विद्यार्थ्यांचे पालक मात्र पुरते हादरून गेलेले असल्याचे उघड झाले आहे.
दरम्यान या घटनेत वापरलेला ५ हजार रुपये किंमतीचा एक स्टील लोखंडी बनावटीचा गावठी कट्टा त्यास मुठीस चॉकलेटी रंगाची प्लास्टीकची पट्टा असलेला सदर गावठी कट्टयास खाली मॅगझिन असलेला जु.वा.कि.अं.४ हजार रुपये किंमतीचे २ राऊंड ७.५५ एम.एम.असलेले जुने वापरते,२ हजार रुपये किंमतीचा एक लोखंडी स्टिल बनावटीचा हुबेहुब पिस्टल सारखा दिसणारे लायटर असा एकूण 11 हजार रुपयांचा ऐवज शहर पोलिसांनी जप्त केला आहे.
दरम्यान कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक उद्धव दामले यांनी याबाबत अधिकची चौकशी केली असता सदर पिस्तुल हे हुबेहूब पिस्तुलासारखे दिसणारे असून ते लायटर असल्याची माहिती उघड झाली आहे.त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.मात्र हिसंक हिंदी सिनेमे,मालिका,रिल्स पाहून नवीन पिढी त्याकडे आकर्षित होत असून त्यामुळे आगामी काळात समाजापुढे आणि पालकांपुढे काय वाढून ठेवले आहे याची या निमित्ताने चुणूक दिसून आली आहे.मात्र तरुण जुन्या एका गुन्ह्यात पोलिसांना हवा असल्याने त्यांना या निमित्ताने आयती शिकार सापडली असल्याचे बोलले जात आहे.”आ बैल,मुझे मार” म्हणतात ते यालाच.त्यामुळे त्याची रवानगी कारागृहात केली असल्याचे माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे पालकांनी यातून बोध घेण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.



