गुन्हे विषयक
महिलेस घरात घुसून मारहाण,दोघांविरुद्ध गुन्हा !

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
आपला भाऊ नितीन जोशी याने उसने घेतलेले पैसे दिले नाही याचा राग मनात धरून आपल्याला व आपल्या वडीलांना संशयित आरोपी संदीप मोतीराम शेवाळे रा.कन्या शाळेजवळ व त्याचा अन्य सहकारी सोनू पंढरीनाथ गोर्डे रा.बँक कॉलनी,जबर मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात फिर्यादी महिला प्राजक्ता वाल्मीक जोशी (वय-27 ) रा.सावरकर चौक,कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

दरम्यान आज सकाळी पुन्हा एक गुन्हा आरोपी संदीप मोतीराम शेवाळे रा.कन्या शाळेजवळ व त्याचा अन्य सहकारी सोनू पंढरीनाथ गोर्डे या दोघांविरुद्ध वाल्मीक नथुराम जोशी यांनी दाखल केला असल्याची माहिती आहे.त्यामुळे शहरात अवैध सावकारी करणाऱ्या असामाजिक तत्वांविरुद्ध समाजात संताप व्यक्त होत आहे.यातील आरोपी सोबत एक सेनेचा एक पदाधिकारी सामील असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
कोपरगाव शहरात गुन्ह्याचा आलेख सातत्याने वाढताना दिसत आहे.त्यामुळे नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगावे लागत असल्याचे चित्र आहे.मागील सप्ताहात निवारा आणि सुभद्रा नगरपरिसरात चोरट्यांनी हातात कत्या घेऊन शहरात दहशत निर्माण केली असल्याचे चल चित्रण सी सी.टी.व्ही.टी कैद झले आहे.त्यानंतर अर्ध्या चड्डीवाली गँग चर्चेत आली आहे.दुचाकी आणि चारचाकी गुन्ह्याची मोजदादच नाही.त्यामुळे चोरटे चेकाळले असल्याचे दुर्दैवी चित्र दिसून येत आहे.या प्रकरणी अजित पवार उपमुख्यमंत्री असताना आ.आशुतोष काळे यांनी त्यांना निवेदन देऊन याबाबत लक्ष देण्याची विनंती केली होती.मात्र त्यानंतर त्यांचे अल्पावधीत अपघाती निधन झाले आहे.मात्र त्यानंतर काही बदल होईल ही अपेक्षा सपशेल फोल ठरली आहे.बरेच गुन्हे दाखलच होत नाही अशी नागरिकांत चर्चा सुरू आहे.तर अलीकडील काळात अवैध सावकारी मोठ्या प्रमाणावर व अवाच्यासव्वा दराने वाढली आहे.त्यामुळे शहरातील कायदा सुवव्यवस्थेचा बोजवारा उडाला की काय असी स्थिती निर्माण झाली आहे.अशीच एक घटना काल रात्री उघडकीस आली असून यात आरोपी संदीप मोतीराम शेवाळे याचेकडून फिर्यादी महिलेचा भाऊ नितीन जोशी याने दीड लाख रुपयांची रक्कम सन-2023 साली उसनवार (की व्याजाने ? कारण कोपरगावात सुलतानी व्याजाचा मोठा धंदा सुरू आहे ) घेतली होती.त्यानंतर सदर रक्कम आपण परत केली असल्याचा फिर्यादी आणि त्यांच्या कुटुंबाचा दावा आहे.
तथापि दि.11 मार्च रोजी रात्री 8.45 वाजेच्या सुमारास आरोपी संदीप शेवाळे व त्याचा अन्य सहकारी सोनू गोर्डे हे दोघे सावरकर चौकात राहत असलेल्या फिर्यादी महिला प्राजक्ता जोशी यांचे घरी गेले होते.व त्यांनी पैशाची मागणी केली होती.पैसे मिळतं नाही हे पाहून त्यांनी आपले वडील वाल्मीक जोशी यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली होती.वडीलांना मारहाण करत आहेत ही बाब पाहून सदर फिर्यादी महिला प्राजक्ता जोशी या त्यांना सोडवण्यास गेल्या असता त्यांनाही शेवाळे याने मारहाण केली असल्याचे दावा केला आहे.तुम्ही सदरचे पैसे दिले नाही तर आम्ही तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली असल्याचे आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी भारतीय न्याय संहिता कायदा कलम 115(2),352,351(2) अन्वये अदखलपात्र गुन्हा क्रं.173/2026 हा आरोपी विरुद्ध दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस हे.कॉन्स्टेबल करीत आहेत.दरम्यान याबाबत वाल्मीक नथुराम जोशी यांनी अजून एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आहे.



