गुन्हे विषयक
…या ठिकाणी दोन गटात मारहाण,गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत ग्रामस्थांची धाव!

न्यूजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर ग्रामपंचायत हद्दीत आज सायंकाळच्या सुमारास एका स्थळाजवळ एक इसमास मारहाण झाल्याने दोन गटात मोठा वाद निर्माण झाला असून त्यामुळे संतप्त गटाने आज उशिरा कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन ०५ आरोपींवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून पोलिस ठाण्याच्या समोरच धरणे धरले असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे.त्यामुळे शहाजापूर,सुरेगावसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शहाजापूर ठिकाणी पूजा अर्चा करणाऱ्या एका समाजाच्या इसमास काही (म्हणजेच पाच ) तरुणांनी मारहाण केली असल्याची बातमी आहे.एवढ्यावर हे प्रकरण थांबले असते तर बरे झाले असते मात्र ते तेवढ्यावर थांबले नाही.यातील काही तरुण सुरेगावात गेल्यावर त्यांचेवर दुसऱ्या गटाने हल्ला चढवला असल्याची बातमी आहे.असे तीन हल्ले एकमेकावर झाले असल्याची माहिती आहे.
अलीकडील काळात धर्म आणि त्यांचे अनुयायी यांचे संघर्ष टोकदार होताना दिसत असून किरकोळ कारणावरून संघर्ष होताना दिसत आहे.त्यात जनसामान्य नागरिक नाहक भरडताना दिसत आहे.त्यामुळे एरव्ही गावातील
शांत असणारे वातावरण तापताना दिसत आहे.आज अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील शहाजापूर या ठिकाणी उघडकीस आली आहे.यातील ठिकाणी पूजा अर्चा करणाऱ्या एका अल्पसंख्याक समाजाच्या इसमास काही (म्हणजेच पाच ) तरुणांनी मारहाण केली असल्याची बातमी आहे.एवढ्यावर हे प्रकरण थांबले असते तर बरे झाले असते मात्र ते तेवढ्यावर थांबले नाही.यातील काही तरुण सुरेगावात गेल्यावर त्यांचेवर दुसऱ्या गटाने हल्ला चढवला असल्याची बातमी आहे.असे तीन हल्ले एकमेकावर झाले असल्याची माहिती आहे.परिणामी संतप्त दुसऱ्या गटाने याबाबत न्याय मिळण्यासाठी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यास ही माहिती कळवली होती.असा त्यांचा आक्षेप आहे.मात्र पोलिसांनी त्याची दखल न घेतल्याने त्यांनी मोठा जमाव घेऊन तालुका पोलिस ठाण्यावर चाल करून न्याय मागितला असल्याचे वृत्त असून हा जमाव अद्याप तेथेच तळ ठोकून आहे.आता आगामी काही कालखंडात पोलीस अधिकारी काय भूमिका घेणार याकडे या ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.
बातमी अद्यावत होत आहे…..



