जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

डिजिटल अटकेची भीती दाखवत अधिकाऱ्याची ८७.३० लाखांची लूट !

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

  देशात डिजिटल अटक नावाचा कोणताही प्रकार अस्तित्वात नसताना व राज्य पोलिसांनी वारंवार माध्यमाद्वारे जागृती  करुनही कोपरगाव शहरात एका सेवानिवृत अधिकाऱ्याला तुम्हाला डिजिटल अटक  केले असल्याची बतावणी करून एका ठगाने पती-पत्नीच्या बँक खात्यावरील तब्बल ८७ लाख ३० हजार ४०० रुपयांना गंडा घातला असल्याची धक्कादायक घटना उघडकिस आली असून त्यामुळे शहरातील नागरिकांत खळबळ उडाली आहे.

  

डिजिटल अटकेची भीती दाखवत एकाला फसवले असून कोपरगाव शहरात ही घटना उघडकीस आली आहे.यातील फसवणूक झालेला इसम हा सेवानिवृत असून पिण्याचे पाण्याशी संबंधित विभागात काम करून सेवानिवृत होऊन आपल्या आयुष्याच्या सायंकाळी आपली आलेली सर्व जमा पूंजी त्याने उधळून टाकल्याने त्याचे सर्व होत्याचे नव्हते झाले आहे.त्याबद्दल शहरात चिंता व्यक्त होत आहे.

    सदरचे सविस्तर वृत्त असे की,” वर्तमान काळात माणसाच्या आयुष्यात इंटरनेटचा शिरकाव झाल्यामुळं आयुष्य सोपं झालं आहे,पण त्याचबरोबर अडचणींमध्येही वाढ झाली आहे.ऑनलाइन घोटाळ्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे.हे घोटाळेबाज रोज वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत.डिजिटल अटक हा आता त्यात एक नवीन प्रकार उदयाला आला आहे.डिजिटल अटक म्हणजे डिजिटल स्वरुपात म्हणजे आभासी किंवा मायावी अटक.या प्रकारात एखादी व्यक्ती पोलीस असल्याचं सांगून किंवा ई.डी.किंवा सी.बी.आय.चा अधिकारी असल्याचं सांगून मेसेज पाठवतो किंवा थेट व्हीडिओ कॉल करतो.तुम्हाला ड्रग्स किंवा मनी लाँड्रिंगच्या प्रकरणात डिजिटल अटक करत असल्याची बतावणी करतो.कधी म्हणतो की,तुम्ही परदेशात जे साहित्य पाठवलं आहे ते बेकायदेशीर आहे.मी असं काही पाठवलं नाही असं सांगितलं,तर तुमचं आधार कार्ड आणि फोन नंबर त्यावर आहे असं सांगण्यात येतं. त्यानंतर बराच वेळ ती व्यक्ती तुम्हाला व्हॉट्सअप किंवा स्काइप कॉलवर रहायला सांगते.कारण तुम्हाला अटक झाली आहे असं तो सांगतो.आणि आता या तथाकथित गुन्ह्यातून तुम्हाला जामीन हवा असेल तर पैशाची मागणी केली जाते.समोरचा व्यक्ती म्हणतो की,”पैसे पाठवा म्हणजे केस करणार नाही” व्हीडिओ कॉलवर पोलिसांच्या गणवेशात एक व्यक्ती बसलेला असतो.इतकंच काय तर अगदी पोलीस ठाण्यासारखं येथील वातावरण बनवलेले सुद्धा असते.मग लोक घाबरून पैसे पाठवतात आणि तिथे घोटाळेबाजांचा उद्देश साध्य झालेला असतो.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात उघडकीस आली आहे.यातील फसवणूक झालेला इसम हा सेवानिवृत असून पिण्याच्या पाण्याशी संबंधित विभागात काम करून सेवानिवृत होऊन आपल्या आयुष्याच्या सायंकाळी आपली आलेली सर्व जमा पूंजी त्याने उधळून टाकल्याने त्याचे सर्व होत्याचे नव्हते झाले आहे.

 

दरम्यान या घटनेतील भामट्याने ही रक्कम काढण्यासाठी त्याच्या आय.सी.आय.सी.आय.बँक खाते वाशी या सगुणा मोरे क्रं.0151050 18307 व दुसरे बँक खाते क्रं.333905 500 581) या दोन खात्याचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्याच्या खात्याच्या वापर कर्त्यांचे नाव पोलिसांना उपलब्ध होऊ शकलेले नाही.

   यातील ठगी आरोपी इसमाने 8429 490 147 व 9044 955 280 या मोबाईल फोन वरून व व्हॉट्सॲप कॉल करून,”तुमचे कॅनरा बँकेत खाते असून त्याचे एटीएमचा वापर ओ.एम.ए.सलाम पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ.आय.) व मणी लाँड्रिंगच्या केसमध्ये झाला असून तुम्हाला डिजिटल अटक झाली आहे.अशी धमकी देऊन फिर्यादी यांना भीती दाखवून फिर्यादीचे बँक ऑफ इंडियातून रुपये ३४ लाख २० हजार २०० व फिर्यादीची पत्नी यांचे स्टेट बँक ऑफ इंडिया मधून रुपये ५३ लाख १० हजार २०० असे एकूण ८७ लाख ३० हजार ४०० रुपयांची जबरी फसवणूक केली आहे.दरम्यान या भामट्याने ही रक्कम काढण्यासाठी त्याच्या आय.सी.आय.सी.आय.बँक खाते वाशी या सगुणा मोरे क्रं.0151050 18307 व दुसरे बँक खाते क्रं.333905 500 581) या दोन खात्याचा वापर केला असल्याचे उघड झाले आहे.मात्र त्याच्या खात्याच्या वापर कर्त्यांचे नाव पोलिसांना उपलब्ध होऊ शकलेले नाही.

कोपरगाव शहर पोलिस ठाणे.

   दरम्यान या गुन्ह्याची माहिती मिळताच शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी घटनासाठी धाव घेतली आहे.व ताबडतोब गुन्हा दाखल करून पुढील चौकशी सुरू केली आहे.घटना दि.१२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी व सायंकाळी अशा दोन टप्प्यात घडली असून गुन्हा दि.२० जानेवारी रोजी रात्री ८.२६ वाजता दाखल झाला आहे.

  या प्रकरणी त्यांनी हा आर्थिक गंभीर धोका झाल्यावर कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा क्रं.२९/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४),३१६(२) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक कुंभार यांचे  मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिपक रोठे हे करीत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close