जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…’ त्या’ खुनाची उकल झाली,आरोपी गजाआड !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(नानासाहेब जवरे)

  कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवनात शनिवार दि .०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० बाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.याबाबत कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्याला तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून सदर महिलेचा खून तिचा धारणगाव सोनार वस्ती येथील रहिवासी नवरा संजय हिरामण मोहिते (वय-३७) यांनेच केला असल्याची धक्कादायक माहिती शहर पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली असून पत्रकार परिषद सुरू आहे.

संकल्पित छायाचित्र.

 

दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,श्रीरामपूर येथील अप्पर जिल्हा अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष वमने यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पोलीस उपनिरीक्षक दिपक रोठे,संदिप सोन्ने, आदी सह त्यांच्या पथकाने मोलाची भूमिका निभावली आहे.त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

  याबाबत सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चांदेकसारे येथील काटवणात शनिवार दि .०९ ऑगस्ट रोजी दुपारी ४.३० बाजेच्या पूर्वी अज्ञात आरोपीने साधारण ४५ वय असलेल्या महिलेचा अज्ञात कारणाने खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी तिला जाळण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्याचे उघड झाले होते.ही घटना उघड झाल्यावर चांदेकसारे शिवारात खळबळ उडाली होतो.याबाबत चांदेकसारे येथील महिला पोलिस पाटील मीराबाई गोरक्षनाथ रोकडे (वय-५६) यांनी कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला होता.तो पासून शहर पोलिसांनी हा तपासासाठी हाती पायताण घेतले होते.अखेर या तपासात पोलिसांना निर्णायक यश मिळाले आहे.त्यांनी मयत महिलेचा पती संजय मोहिते यास सावळीविहिर जवळून अटक केली आहे.

  

 

दरम्यान आरोपीच्या पहील्या पत्नीचे आणि त्याचे कोर्टात वाद चालु आहेत.त्याचे पत्नीचे हातावर ‘ राहुल बापु’ असे गोंदलेले होते अशी माहीती मिळाल्याने गुन्हयातील मयत हिचे हातावर देखील राहुल बापु व स्टारचे चिन्ह असे गोंदलेले आढळुन आल्याने आरोपी पर्यंत पोहचणे सोपे गेले आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला असता त्यांनी महाराष्ट्रातील मिळुन न आलेल्या मिसींगची व गुन्हयातील मयत महिलांचे मिळते जुळते वर्णनाच्या व्यक्तीची महिलांची वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला जावुन माहीती घेतली तसेच सी सीटीएनएस प्रणालीवर आय सी.जे.एस. पोर्टलवरुन मिळुन न आलेल्या मिसींगची माहीती घेतली असता,कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनला एक इसम निघुन गेला असले बाबत मिसींग दाखल होती.सदर मिसींगमधील व्यक्ती हो संजय हिरामण मोहीते (वय-३७ वर्ष) रा.सोनारवस्ती,धारणगाव ता.कोपरगाव येथील असल्याची माहीती प्राप्त झाल होती.

  सदर हरवलेली व्यक्ती संजय ऊर्फ बापु हिरामण मोहोते असल्याचे उघड झाल्याने पोलिसांना पुढील तपास करणे सोपे गेले आहे.या आरोपी इसमाचे दोन लग्न झालेले होते.दरम्यान पहील्या पत्नीचे आणि त्याचे कोर्टात वाद चालु आहेत.त्याचे पत्नीचे हातावर ‘ राहुल बापु’ असे गोंदलेले होते अशी माहीती मिळाल्याने गुन्हयातील मयत हिचे हातावर देखील राहुल बापु व स्टारचे चिन्ह असे गोंदलेले आढळुन आल्याने आरोपी पर्यंत पोहचणे सोपे गेले आहे.शहर पोलिसांनी सदर इसमाचा मोबाईल नंबर प्राप्त करुन तांत्रीक विश्लेषण केले व आधारे नमुद इसमांचा तपास केला असता संजय हिरामण मोहीते हा शिडी परिसरात असल्याची माहीती प्राप्त झाली होती.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांनी शिर्डी परिसरात सदर इसमांचा शोध घेत असतांना पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना गोपनीय बातमी मिळाली की,”सदर इसम हा सावळीविहीर फाट्याजवळ थांबलेला आहे.त्या माहितीनुसार सावळीविहीर फाट्यावर जावुन खात्री केली असता,रोडचे बाजुला एका ठिकाणी एक इसम उभा दिसला तेव्हा पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी त्याचे जवळ जावुन त्यास पकडत असतांना तो पळून जाण्याचा प्रयत्न करत असतांना त्यास पोलिस पथकाने पकडले आहे.त्याचा तपास केला असता संशयित आरोपी हा संजय ऊर्फ बापू हिरामण मोहीते (वय-३७ वर्षे )रा.सोनारवस्ती,धारणगाव ता. कोपरगाव असल्याचे उघड झाले आहे.प्रारंभी त्याने अन्य आरोपीप्रमाणेच उडवाउडवीचे उत्तरे दिली.मात्र पोलिसी हिसका दाखवला असता त्याने सदर गुन्हयातील मयत अनोळखी स्त्री वय- ४० ते ४५ वर्षे हि त्याची पहिली पत्नी असल्याची कबुली देऊन तिचे नाव वनिता ऊर्फ वर्षा हिरामण हारावत (मोहीते) असे असल्याचे सांगितले आहे.ती गुमगाव,हिंगणा जि.नागपुर येथे तिचे आई वडिलांकडे राहत होती.त्यांचे कौटुंबिक वादातुन होणारे त्रासामुळे संजय हिरामण मोहोते याने ती कोपरगाव येथे आल्यानंतर तिला त्याचे एक साथीदाराचे मदतीने कोपरगाव येथुन डाऊच बु.गावचे शिवारात उंबरी नाल्याजवळ घेवुन जावुन त्या ठिकाणी तिचा गळा आवळुन तिचा खुन करुन प्रेत कोणाला ओळखू येवु नये म्हणुन पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने प्रेत अर्धवट जाळून टाकुन त्या ठिकाणवरुन पसार झाला असल्याचे सांगितले आहे.त्यामुळे पोलिसांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

दरम्यान सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे,श्रीरामपूर येथील अप्पर जिल्हा अधीक्षक सोमनाथ वाघचौरे,शिर्डी येथील उपविभागीय पोलिस अधिकारी शिरिष वमने यांचे मार्गदर्शनाखाली कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक रामकृष्ण कुंभार,सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार,पोलीस उपनिरीक्षक  दिपक रोठे,संदिप सोन्ने, पो.हे.कॉन्स्टेबल बयन तमनर,किशोर जाधव,दिपक रोकडे,पो.कों.गणेश काकडे,यमनाजी सुंबे, प्रविण घुले,श्रीकांत कुन्हाडे,अशोक शिंदे, इरफान शेख आदींनी चोख भुमिका बजावली  आहे.या कारवाईची कोपरगाव शहर आणि तालुक्यातील नागरिकांनी स्वागत केले आहे.

—————————————————————-

*विश्वसनीय बातम्या *फ्री ‘न्यूजसेवा’* साठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप’मध्ये सामील व्हा*
https://bit.ly/newsseva2024
*न्यूजसेवा* डिजिटल युग डिजिटल बातमी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close