जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोयत्याने तरुणावर वाऱ,चार जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरातील उपनगर असलेल्या गांधीनगर येथील रहिवासी तरुण रुपेश ज्ञानेश्वर गायकवाड (वय -२३) हा रस्त्याने जात असताना आरोपी हर्षल काकडे,रोहित कुंढारे,गणेश रोकडे,वैभव कुऱ्हाडे आदींनी दि.२६ जूनच्या पहाटे हल्ला चढवला असून शिवीगाळ करत बेस बॉलच्या दांडक्याने व कोयत्याने मारहाण करून त्यास गंभीररीत्या जखमी केला असल्याचा गुन्हा कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने शहर आणि तालुक्यात खळबळ उडाली आहे.

  

नवीन पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे हजर झाले असून त्यांच्याकडून शहरातील गुन्हेगारी कमी होण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.त्यांनी सुरुवातीला अवैध वाहतूक आणि दुचाकीस्वार आदींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यात दहशत केली आहे.मात्र गांधीनगर,सुभाषनगर,गट क्रमांक १०५ हनुमाननगर,संजय नगर,खडकी आदी उपनगरात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसत आहे.त्यावर अंकुंश ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे.

  कोपरगाव शहरात आता नवीन पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे हजर झाले असून त्यांच्याकडून शहरातील गुन्हेगारी कमी होण्याची नागरिकांची अपेक्षा आहे.त्यांनी सुरुवातीला अवैध वाहतूक आणि दुचाकीस्वार आदींवर गुन्हे दाखल करून त्यांच्यात दहशत केली असून अनेक अवैध व्यवसायिक यांच्या मनात दहशत केली आहे.मात्र गांधीनगर,सुभाषनगर,गट क्रमांक १०५ हनुमाननगर,संजय नगर,खडकी आदी उपनगरात गुन्हेगारी वाढत असल्याचं दिसत आहे.त्यावर अंकुंश ठेवण्याची जबाबदारी वाढली आहे.अशातच काल पहाटे ०३ वाजेच्या सुमारास वरील फिर्यादी तरुण रुपेश गायकवाड हा गांधीनगर हनुमान मंदिराच्या जवळूनच जात असताना त्यास आरोपी हर्षल काकडे याने त्याची गच्ची पकडुन त्यास खाली पाडून शिवीगाळ करून दमदाटी देऊन त्याच्या हातातील बेस बॉल च्या दांडक्याने त्याच्या हातापाया वर मारहाण केली आहे.तर आरोपी रोहित कुंढारे याने पाईपने तर आरोपी गणेश रोकडे व वैभव कुऱ्हाडे यांनी उलट्या कोयत्याने हातापाया वर मारहाण करून जखमी केले आहे.

   या प्रकरणी फिर्यादी तरुण रुपेश गायकवाड याने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रं.-३३९/२०२५भारतीय न्याय संहिता सन-२०२३ चे कलम ११८(१),११५(२),३५१,३५१(२)३,(५) प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलिस निरीक्षक,सहाय्यक पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार आदींनी भेट दिली आहे.पुढील तपास पोलिस रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हे.को.दिपक रोकडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close