जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

…या पतसंस्थेत व्यवस्थापकाचा ८४.५० लाखांचा आर्थिक घोटाळा !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

कोपरगाव तालुक्यातील करंजी येथील सहकारात अग्रणी असलेल्या रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत व्यवस्थापक पदावर कार्यरत असलेला इसम आयुब बनेमिया शेख याने तब्बल ८४ लाख ४३ हजार १४६ रुपयांचा आर्थिक घोटाळा केला असून त्याने आपल्या व नातेवाईकांच्या नावावर बनावट कर्ज प्रकरणे करुन हि संस्थेची फसवणूक केली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

कोपरगाव तालुक्यातील करंजी ठिकाणी संस्थाचालकांचे दैनंदिन व्यवहारात काही पळवाटा शोधून त्यातून आलेल्या ठेवी दि.०१ एप्रिल २०१६ ते दि.३१ मार्च २०२१ या दरम्यान व्यवस्थापक आयुब शेख याने वेळोवेळी आपल्या व आपल्या भावांच्या नावावर बनावट व कोणतेही तारण न घेता कर्ज दाखवून त्यातील मोठी रक्कम हडप केली आहे.मात्र हे करताना संस्था चालकांना हि बाब समजणार नाही याची खबरदारी घेतली होती.मात्र तालुका पोलिसांनी हे घोटाळ्याचे प्रकरण महिनाभर लपवून का ठेवले हा तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव तालुक्यातील करंजी येथे रयत लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था तेथील कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाण्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी आगवन व त्यांचे सुपुत्र संजय आगवन यांनी जुलै सन-२००० साली स्थापना केली होती.सदर संस्थेवर ग्रामस्थांचा विश्वास असल्याने त्या संस्थेत ठेवीही चांगल्या आल्या होत्या.दरम्यान संस्था चांगली चालत असल्याने त्यांनी तेथील एक होतकरू तरुण म्हणून त्याच गावातील आयुब बनेमिया शेख या इसमांची व्यवस्थापक पदी निवड केली होती.त्याने आधी मोठा विश्वास संपादन केला होता.मात्र सदर ठिकाणी संस्था चालक यांचे दैनंदिन व्यवहारात काही पळवाटा शोधून त्यातून आलेल्या ठेवी दि.०१ एप्रिल २०१६ ते दि.३१ मार्च २०२१ या दरम्यान वेळोवेळी आपल्या व आपल्या भावांच्या नावावर बनावट व कोणतेही तारण न घेता कर्ज दाखवून त्यातील मोठी रक्कम हडप केली आहे.मात्र हे करताना संस्था चालकांना हि बाब समजणार नाही याची खबरदारी घेतली होती.मात्र यात संस्थाचालक यांना काही महिन्या पूर्वी संशय आल्याने त्यांनी सदर संस्थेचे लेखा परीक्षक मनीष पटेल यांचेकडून अंतर्गत लेखा परीक्षण करून घेतले होते.त्यात हा घोटाळा निदर्शनास आला आहे.त्यांनी लेखा परीक्षक मनीष सुनील पटेल (वय-५३) यांचेकडून सदर लेखा परीक्षण केल्यावर या प्रकरणी नुकताच आरोपी आयुब शेख याचे विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.या घोटाळ्या प्रकरणी संस्था चालकांनी दुजोरा दिला आहे.

दरम्यान या प्रकरणी शिर्डी पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने,कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस पोलीस निरीक्षक संदीप कोळी,पो.हे.कॉ.संतोष लांडे आदींनी घटनास्थळी भेट दिली आहे.

   दरम्यान त्यावरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी आरोपी विरुद्ध नुकताच दि.०५ मार्च रोजी रात्री उशिरा गु.क्रं.७६/२०२४ भा.द.वि.कलम ४०९,४१९,४२०,महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संबंधांचे संरक्षण १९९९ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    दरम्यान या प्रकरणी पुढील तपास शिर्डीचे पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांचे मार्गदर्शनाखाली पो.नीं.संदीप कोळी हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close