जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगाव नजीक ६२.५ हजारांची चोरी,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
   

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी हे बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरावर पाळत ठेवून अज्ञात चोरट्याने घरातील सामानाची उचक पाचक करून घरातील लॉकर मधील विविध दागिन्यासंह रोख रकमेसह ६२ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.त्यामुळे फिर्यादी आशाबाई भावराव गायकवाड (वय-६०) यांनी अज्ञात आरोपी विरुद्ध कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

  

कोपरगाव बाजार तळ येथे लक्ष्मीमाता मंदिरात दान पेटी फोडून चोरी घडण्याची दुर्दैवी घटना घडली असताना आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेऊर कुंभारी हद्दीत आणखी एक ६२ हजार ५०० रुपयांची चोरी उघड झाली आहे.विशेष। म्हणजे त्याच दिवशी हि घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात दुष्काळाच्या झळा या वर्षी मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.त्यामुळे चोरट्यांनी आपापले प्रताप दाखवण्यास सुरुवात केल्याचे आता उघड होऊ लागले असून अशीच एक घटना कोपरगाव शहरात दि.१४ मार्च रोजी रात्री ०७-०८ वाजेच्या सुमारास कोपरगाव बाजार तळ येथे लक्ष्मीमाता मंदिरात दान पेटी फोडून चोरी घडण्याची दुर्दैवी घटना घडली असताना आज कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जेऊर कुंभारी हद्दीत आणखी एक ६२ हजार ५०० रुपयांची चोरी उघड झाली आहे.

   या प्रकरणी फिर्यादी आशाबाई गायकवाड (वय-६०)यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपण दि.१४ मार्च रोजी सकाळी ०९ नंतर बाहेरगावी गेले असता त्यांच्या घरावर अज्ञात चोरट्यानी पाळत ठेवली होती.व ते आपल्या घरी दि.१८ मार्चं रोजी आले असता त्यांचे घराचे कुलूप तोडून घरातील सामानाची उचकपाचक करून कपाटातील लॉकर मध्ये ठेवलेले २५ हजार रुपये किमतीचे एक तोळ्याची जुनी वापरती मोहन माळ,२५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे वापरते जुने मंगळसूत्र,७ हजार ५०० रुपयांची एक जुनी वापरती सोन्याची अंगठी, तसेच ०५ हजार रुपये रोख (त्यात ५०० दराच्या १० नोटा)असा सुमारे ६२ हजार ५०० रुपयांचा अवैज लंपास केला आहे.

   दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन गुन्हा क्रं.१३४/२०२४ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८० प्रमाणे दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पोलिस हे.कॉ.के.ए.जाधव आदींनी भेट दिली आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार के.ए.जाधव हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close