जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोयत्याचा धाक दाखवून मारहाण,तीन जणांवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)


   कोपरगाव तालुक्यातही वारी येथील रहिवासी असलेला फिर्यादी तरुण बुद्धभूषण बापू निळे (वय-१७) यास वारी शिवारातील गोदावरी नदीच्या पुलावर सायंकाळी ०७ वाजेच्या सुमारास त्याच गावातील आरोपी ऋषिकेश जाधव,सनी जाधव,रोहित दयानंद पवार आदींनी अडवून कोयत्याचा धाक दाखवून,”तुमच्याकड पाहून घेतो”असे म्हणून लाथा बुक्यांनीं मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू आणि अवैध व्यवसाय यातून अनेक तरुण वाया जाताना दिसत आहे.त्यास आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी राजकीय लोक आश्रय देताना दिसत आहे.या बेताल तरुणांवर पोलीस अधिकाऱ्यांनी धाक निर्माण करणे गरजेचे बनले असून किरकोळ कारणावरून वाद उद्भताना दिसत आहे.यावर प्रतिबंध करणे गरजेचे आहे.

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू आणि अवैध व्यवसाय यातून अनेक तरुण वाया जाताना दिसत आहे.त्यास आपल्या राजकीय पोळ्या भाजण्यासाठी राजकीय लोक आश्रय देताना दिसत आहे.या बेताल तरुणांवर पोलीस अधिकाऱ्यांनी धाक निर्माण करणे गरजेचे बनले असून किरकोळ कारणावरून वाद उद्भताना दिसत आहे.पोलीस अधिकाऱ्यांनी गावागावातील बेबंद तरुणांवर कारवाई केली तर बरेच गुन्हे कमी होऊ शकतात.मात्र त्या कडे पोलीस विभागाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.अशीच घटना वारी शिवारात नुकतीच  घडली आहे.

   या फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटलें आहे की,”आपण दि.११ मार्च रोजी सायंकाळी ०७व वाजेच्या सुमारास गोदावरी नदीच्या पुलावरून जात असतांना वारी गावातील आरोपी ऋषिकेश जाधव,सनी जाधव,(दोघांचे पूर्ण नाही माहिती नाही)रोहित दयानंद पवार आदींनी अडवून कोयत्याचा धाक दाखवून,”तुमच्याकड पाहून घेतो”असे म्हणून लाथा बुक्यांनीं मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे आपल्या फिर्यादीत म्हटलं आहे.या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्यादी तरुण बुद्धभूषण निळे याने गुन्हा ८३/२०२४ भा.द.वि.३२३,५०४,५०६,आर्म ऍक्ट कलम ४/२५ प्रमाणे दाखल केला आहे.

  दरम्यान या प्रकरणी पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस ठण्याचे पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.अशोक गवसणे हे करत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close