जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

महिलेची आत्महत्या,तीन आरोपींवर गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरातील अंबिकानगर येथील रहिवासी असलेली महिला निता मनोज शर्मा (वय-२६) हिला सासरच्या नातेवाईकांनी माहेरून दुचाकी आणण्यासाठी व किरोकळ घरगुती कारणावरून वारंवार शिवीगाळ व मारहाण करून शारीरिक,मानसिक छळ करून आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्या प्रकरणी आरोपी नवरा मनोज कृष्णा शर्मा,सुरेखा कृष्णा शर्मा व मोन्या उर्फ प्रमेश कृष्णा वर्मा आदींवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात आशाबाई राधाकिसन वंजारी (वय-४५) प्रसादनगर शिर्डी यांनी गुन्हा दाखल केला आहे.त्यामुळे कोपरगाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

विभिन्न राज्यातून वर्ष २०१२ मध्ये हुंड्यासाठी हत्याचे ८,२३३ प्रकरण समोर आले होते.आकड़े सांगतात की सुमारे प्रत्येक घंट्यात एक महिला हुंडाबळी चढ़ते.तरीही या गुन्ह्यात कमी येण्याची शक्यता नाही.अशा गुन्ह्यात दिवसानजीक वाढ होत असून अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात अंबिकानगर येथे नुकतीच घडली आहे.

आजच्या आधुनिक काळात हुंडा पद्धत नावाचा राक्षस सर्व दूर पसरले आहे.मागासलेल्या भारतीय समाजात हुंडा प्रथा आत्तापर्यंत विकराल रूपात आहे.हत्या देशात सुमारे दर एका तासात एक महिला हुंडा संबंधी कारणांनी मरण पावते आणि वर्ष २००७ ते २०११ च्या मध्ये या प्रकाराच्या प्रकरणात खूप वृद्धि झाली.राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे अपराध आंकड़े सांगतात की विभिन्न राज्यातून वर्ष २०१२ मध्ये हुंड्यासाठी हत्याचे ८,२३३ प्रकरण समोर आले होते.आकड़े सांगतात की सुमारे प्रत्येक घंट्यात एक महिला हुंडाबळी चढ़ते.तरीही या गुन्ह्यात कमी येण्याची शक्यता नाही.अशा गुन्ह्यात दिवसानजीक वाढ होत असून अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहरात नुकतीच घडली आहे.या प्रकरणी नुकताच अंबिकानगर येथील महिलेला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

   यातील फिर्यादीने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”आपली मुलगी नीता शर्मा हि सासरी असताना सासरकडील वरील आरोपीनी नऊ वर्षांपासून तिला माहेरकडून दुचाकी आणण्यासाठी वारंवार शिवीगाळ करून मारहाण केली आहे.तिला शारिरीक मानसिक त्रास देऊन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले आहे.

   दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे आदींनी भेट दिली आहे.

   या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.५१५/२०२३ भा.द.वि.कलम ३०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश येसेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close