जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

  …या अड्ड्यावर पोलिसांचा छापा,आरोपी फरार !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)
      
राज्यात गणोशोत्सव मोठ्या उत्साहात सुरू असताना काही नागरिक अवैध व्यवसाय करून कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे काढत असताना कोपरगाव तालुका पोलिसांनी नुकतीच सुरेगाव हद्दीत पाटाच्या कडेला टपरीच्या आडोशाला अवैध दारू निर्मितीचा व्यवसाय करणारी महिला मंदाबाई दादा काळे हिच्या अवैध हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून तेथील सुमारे ०५ हजार रुपये किमतीचे दारू निर्मितीचे रसायन नष्ट केले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव हद्दीत एक महिला अवैध दारूनिर्मिती करत असल्याची माहिती प्राप्त झाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकल्यावर आरोपी महिला मंदाबाई काळे हिस पोलिसांचा सुगावा लागल्यावर ती तत्काळ घटनास्थळावरून फरार झाली आहे.

वर्तमानात गणोशोत्सव सुरु असून पोलिसांनी अवैध व्यवसाय करणाऱ्यांना इशारा दिला असताना काही सामाजिक तत्व त्याचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहे.त्यामुळे पोलिसांना कठोर भूमिका घ्यावी लागत असल्याचे दिसत आहे.अशीच घटना नुकतीच कोपरगाव शहराच्या पश्चिमेस साधारण सतरा कि.मी.अंतरावर असलेल्या सुरेगाव हद्दीत  गोदावरी डाव्या कालव्याच्या कडेला टपरीच्या आडोशाला घडली आहे. पोलिसांना गुप्त खबऱ्या मार्फत बातमी मिळाली की,सुरेगाव हद्दीत एक महिला अवैध दारूनिर्मिती करत आहे.
दरम्यान त्या खबरी प्रमाणे पोलिसांनी घटनास्थळी धाड टाकल्यावर आरोपी महिला मंदाबाई काळे हिस पोलिसांचा सुगावा लागल्यावर ती तत्काळ घटनास्थळावरून फरार झाली आहे.तालुका पोलिसांनी त्या ठिकाणी असलेले दोन ड्रम मध्ये असलेले सुमारे ५० लिटर दारू बनवण्याचे सुमारे ०५ हजार रुपयांचे रसायन नष्ट केले आहे.

दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर यांनी भेट दिली आहे.
              
दरम्यान या आरोपी विरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.४६२/२०२३ महाराष्ट्र दारू बंदी कायदा कलम ६५(ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार वांढेकर हे करत आहेत.




Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close