निधन वार्ता
पोलीस पाटील वाबळे यांचे निधन

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथील रहिवासी व राज्य कामगार पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष व सुरेगावचे पोलीस पाटील संजय कृष्णराव वाबळे (वय-५८) यांचे आज सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास राहत्या घरी हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले आहे.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

स्व.संजय वाबळे यांनी पोलिसांच्या मानधन वाढीसाठी राज्यपातळीवर यशस्वीपणे लढा दिला होता.या शिवाय सहकारी संस्थांवर पोलीस पाटील हा घटक घ्यावा ही मागणी राज्य सरकारने मान्य केली होती.त्यांनी पोलीस पाटलांसाठी शेवटपर्यंत लढा दिला.त्यांनी आपल्या काळात सुरेगाव ग्रामपंचायतीला महात्मा गांधी तंटा मुक्तीचा १०लाख रुपयांचा पुरस्कार मिळवून दिला होता.
त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्यावर सुरेगाव येथे गोदावरी तीरी दुपारी ०४ वाजता संपन्न होणार आहे.
त्यांच्या निधनाबद्दल कोपरगाव चे आ.आशुतोष काळे,माजी आ.अशोक काळे,कोपरगाव पंचायत समितीचे माजी सभापती अर्जुन काळे,प्रशांत वाबळे,पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश आव्हाड,सुरेगाव ग्रामपंचायतचे सरपंच शशिकांत वाबळे,माजी सरपंच सचिन कोळपे,ग्रामविकास अधिकारी दिगंबर बनकर आदींनी दुःख व्यक्त केले आहे.