जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

कोपरगावात चोरीचा गुन्हा,आरोपी मुद्देमालासह अटक

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहरातील निवारा परिसरातील रहिवासी असलेले व सोमैय्या महाविद्यालयासमोर आपले दुकान थाटलेले दुकानदार सोमनाथ बबनलाल अग्रवाल (वय-३७) यांच्या गाडीची सुमारे ०६ हजार रुपये किमतीची एक्साइड कंपनीची बॅटरी मालेगाव येथील आरोपी अरमान सलीम शेख (वय-१९) रा.मालदा शिवार मालेगाव जि.नाशिक याने चोरून नेत असताना त्यास दुकानदार अग्रवाल यांनी रंगेहात पकडले होते.व त्यास कोपरगाव शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.त्यामुळे सदर दुकानदाराचे व शहर पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोपरगाव शहातील फिर्यादी सोमनाथ अग्रवाल हे आपले दुकान नियमितप्रमाणे सायंकाळी बंद करून ते आपल्या घरी गेले असता दि.०६ जुलै च्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक चोरटा त्यांच्या भेळीच्या दुकानांच्या गाडीची ‘टाटा एक्साइड’ कंपनीची सुमारे ०६ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेणारा वरील ठिकाणचा आरोपी आरमान शेख यास शहर दुकानदाराने रंगेहात जेरबंद केला आहे त्यामुळे दुकांदाराचे व पोलिसांचे कौतुक होत आहे.

कोपरगाव तालुक्यात चोरट्यांचा आणि बेकायदा व्यवसायाचा सुळसुळात झाला आहे.दुचाकी,चारचाकी चोऱ्यासह अन्य भुरट्या चोऱ्या नित्याच्या झाल्या आहेत.त्यामुळे शहरातील नागरिक आणि तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांना शांतचित्त झोप अशक्य झाली आहे.या संबंधी राष्ट्रवादीचे आ.आशुतोष काळे यांनी नुकतीच कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात भेट देऊन याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना फैलावर घेतले होते.मात्र अद्याप तरी त्याचे सकारात्मक परिणाम समोर आलेले नाही.मात्र एका घटनेचा सकारात्मक परिणाम समोर आला आहे.यातील फिर्यादी सोमनाथ अग्रवाल यांचे के.जे.सोमैया समोर गोदावरी नदीच्या वळणावर जुन्या जिल्हा परिषदेच्या विश्रामगृहाजवळ आपली चार चाकी वाहन उभे करून ते आपला भेळीच्या व्यवसाय करत आहे.त्यांनी आपले नियमित दुकान सायंकाळी बंद करून ते आपल्या घरी गेले असता दि.०६ जुलै च्या रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक चोरटा सोमनाथ अग्रवाल यांच्या भेळीच्या दुकानांच्या गाडीची ‘टाटा एक्साइड’ कंपनीची सुमारे ०६ हजार रुपये किमतीची बॅटरी चोरून नेत असताना त्यांना अज्ञात इसमाने तुमच्या दुकानांची चोरी होत असल्याची बितंबातमी दिली होती.त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्यांनी वरील ठिकाणचा आरोपी आरमान शेख यास रंगरहात पकडला आहे.व पोलिसांच्या ताब्यात दिला आहे.त्यानंतर शहर पोलिसांनी त्यास जेरबंद केला होता.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी सोमनाथ अग्रवाल यांनी गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी गुन्हा क्रं.३१८/२०२३ भा.द.वि.कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बी.एस.कोरेकर हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close