जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अल्पवयीन मुलगी पळवली,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव (हनुमानवाडी) ग्रामपंचायत हद्दीत रहिवासी असलेली फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी (वय-१७वर्ष ९ महिने) हिला अज्ञात इसमाने दि.बुधवार दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फूस लावून पळवून नेले असल्याची फिर्यादी मुलीची आई (वय-४०) हिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कान्हेगावसह कोपरगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

जराशी समज येण्याच्या वयातच अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून पळवून नेण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होत आहे.शहर व तालुक्यात आठवड्यातून व पंधरा दिवसातून एक तरी अल्पवयीन मुलगी पळून गेल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल होते.अल्पवयीन मुलगी बेपत्ता झाल्यामुळे न्यायालयाचे आदेशानुसार अशा घटनांमध्ये पोलिसांकडून अपहरणाची तक्रार दाखल केली जाते.मुलीचा शोध घेतल्यानंतर ‘ती’ मित्रासोबत पळून गेल्याचे लक्षात येते.मुलीचे पालक पोलिसांकडे मुलीचा शोध घेऊन तिच्या मित्रावर गुन्हा दाखल करण्यास सांगतात.पोलिसदेखील काही प्रकरणांमध्ये मुलीचा शोध घेऊन तिला परत घेऊन येतात.संबंधित मुलावर गुन्हा दाखल केला जातो.

कधी-कधी पोलिसांना अशा प्रकरणांत बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा लागतो.यामध्ये मुलीच्या पालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो.काही वेळा पालक मुलीच्या भविष्यासाठी तडजोड करण्यास तयार होतात.त्यामुळे दाखल केलेले गुन्हे मागेदेखील घेतले जातात.मात्र यामध्ये पोलिस यंत्रणा कामाला लागते हि बाब वेगळीच.अशीच घटना कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव (हनुमानवाडी) ग्रामपंचायत हद्दीत घडली आहे.त्यामुळे कान्हेगाव व परिसरात खळबळ उडाली आहे.

त्या बाबतचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी मुलीची आई हि कान्हेगाव (हनुमानवाडी) ग्रामपंचायत हद्दीतील रहिवासी असून त्यांचा शेत मजुरीचा व्यवसाय आहे.तेथे ती आपले पती,एक मुलगा,एक मुलगी असे कुटुंब रहात आहेत.बुधवार दि.२० एप्रिल रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास आपण व आपले पती कांदे काढणीचा कामासाठी गेलो होतो. दिवसभर काम करून सायंकाळी ०६ वाजेच्या सुमारास घरी आलो असताना त्या ठिकाणी आपली मुलगी आपल्याला आढळून आलेली नाही.आपण आजूबाजूस शोध घेऊन पाहिले असता ती मिळून आली नाही.त्या नंतर आपण आपले नातेवाईक बाभूळगाव,कोटमगाव,आडगाव, ता.येवला सुरेगाव आदी ठिकाणी शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे सदर आपली मुलगी हि अज्ञात आरोपीने काही तरी प्रलोभन दाखवून अज्ञात करणासाठी आपल्या कायदेशीर रखवालीतून पळवून नेली आहे.त्यामुळे त्यांनी आजूबाजूस शोध घेऊनही ती मिळून आली नाही.त्यामुळे शोध घेऊन कंटाळून त्यांनी अखेर कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या बाबत अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.घटनास्थळी सहाय्यक फौजदार एम.ए.कुसारे यांनी भेट दिली आहे.
कोपरगाव तालुका पोलिसांनी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१४०/२०२२ भा.द.वि.कलम ३६३ प्रमाणे अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार महेश कुसारे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close