अर्थ विषयक
राहाता तालुक्यातील…या सोसायटीची वसुली लक्षवेधी
न्यूजसेवा
लोहगाव-(प्रतिनिधी)
राहता तालुक्यातील लोहगाव येथील सहकारात अग्रणी असलेल्या लोहगाव विविध कार्यकारी सहकारी संस्थांच्या सभासदांनी ३० जुनं २०२१ पर्यंत बॅंक पातळीवर १०० टक्के वसुल झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष राजेंद्र चेचरे उपाध्यक्ष अशोक चेचरे यांनी सभासदांचे अभिनंदन केले आहे.
या संस्थेचे ऐकुन सभासद १८२ असुन सभासदांच्या वेळोवेळी सहकार्यामुळे संस्था तालुक्यात प्रेरणादायी आहे.संस्थेला वेळोवेळी केरूनाथ चेचरे भास्करराव चेचरे,लहानु चेचरे,वसंत चेेचरे,गणेश चेचरे,गणपत चेचरे धुळाजी चेचरे,बनराव चेचरे,कृष्णा चेेचरे,वसंत नेहे यांनीं यावेळी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले आहे.
बॅक पातळीवर वसुलीसाठी रहाता तालुका विकास अधिकारी गुळवे,वाणी,विशेष वसुली अधिकारी गडाख,जिल्हा बँक प्रवरानगर शाखाधिकरी बुचुड,कसार जाधव मॅडम,बर्डे मामा,याचे वसुली कामी सहकार्य लाभले आहे.