जाहिरात-9423439946
अपघात

कोपरगाव नजीक अपघात,तरुण जागीच ठार,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव,संवत्सर (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मुंबई नागपूर राज्य मार्गावर संत जनार्दन स्वामी रुग्णालया जवळ दि.०६ नोव्हेंम्बर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास एका अज्ञात आयशर टेम्पोने हिरो होंडा एच.एफ.सि.डी.डिलक्स (क्रं. एम.एच.१७ ए. के.८५९५) ला दिलेल्या धडकेत संवत्सर लक्ष्मणवाडी येथील महाविद्यालयीन युवक प्रवीण शिवाजीराव रोहोम (वय-२२) यांचा जागीच मृत्यू झाला आहे.त्यामुळे संवत्सर गावात शोककळा पसरली आहे.मयत युवक संवत्सर येथील माजी सरपंच शिवाजीराव रोहोम यांचे चिरंजीव होते.

संवत्सर येथील रहिवासी असलेला तरुण प्रवीण रोहोम हा आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर या राज्य मार्गावरून जात असताना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून नारायण बाबुराव ननवरे यांचे वस्तीजवळ मागील बाजूने एका अज्ञात आयशर चालकाने जोराची धडक दिली त्यात तो मागील टायरखाली सापडला व त्यात त्याचे  दुर्दैवाने घटनास्थळी निधन झाले आहे

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी असलेला तरुण प्रवीण रोहोम हा आज सकाळी ०९ वाजेच्या सुमारास मुंबई-नागपूर या राज्य मार्गावरून जात असताना रस्त्याच्या स्थितीकडे दुर्लक्ष करून नारायण बाबुराव ननवरे यांचे वस्तीजवळ मागील बाजूने एका अज्ञात आयशर चालकाने जोराची धडक दिली त्यात तो मागील टायरखाली सापडला व त्यात त्याचे दुर्दैवाने घटनास्थळी निधन झाले आहे.नजीकच्या नागरिकांनी अपघात स्थळी धाव घेऊन त्यास नजीकच्या रुग्णालयात उपचारार्थ हलवले मात्र तेथे उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले आहे.पुढील उपचारासाठी संबंधितांचे शव कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्या नंतर शव विच्छेदना नंतर त्यावर संवत्सर येथे गोदावरी काठी शोकाकुल वातावरणात अंत्यविधी करण्यात आला आहे.

दरम्यान कोपरगाव शहर पोलिस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे व पो.हे.कॉ.आर.पी.पुंड यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात आयशर चालका विरुद्ध आपल्या दप्तरी गु.र.क्रं.३३१/२०२१भा.द.वि.कलम ३०४(अ),२७९,३३८,४२७ मोटार वाहन कायदा कलम १८४,१३४(अ),(ब),१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.आर.पी.पुंड हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close