निधन वार्ता
नितीन परजणे यांचे निधन

न्यूजसेवा
संवत्सर-(वार्ताहर)
कोपरगांव तालुक्यातील संवत्सर येथील रहिवासी व सद्या अशोक सहकारी साखर कारखान्यामध्ये सेवेत असलेले नितीन राधाकृष्ण परजणे यांचे गुरुवारी दि.२३ ऑक्टोंबर रोजी दुपारी ४ वाजता निधन झाले आहे.मृत्यूसमयी ते ५३ वर्षांचे होते.संवत्सर येथे गोदावरी काठावरील अमरधामध्ये शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. मोठा जनसमुदाय यावेळी उपस्थित होता.

स्व.नितीन परजणे हे यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम केलेले असून त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच जुन्नर परिसरातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात सेवा बजावली आहे.वर्तमानात ते अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यात सेवेत होते.
स्व.नितीन परजणे हे यांनी सामाजिक,राजकीय क्षेत्रात काम केलेले असून त्यांनी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना तसेच जुन्नर परिसरातील संत तुकाराम सहकारी साखर कारखान्यात सेवा बजावली आहे.वर्तमानात ते अशोकनगर येथील अशोक सहकारी साखर कारखान्यात सेवेत होते.गेल्या दोन महिन्यांपासून दुर्धर आजाराशी ते झुंज देत होते.अहिल्यानगर येथील विळद घाटातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते.पंरतु अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली.गुरुवारी दुपारी ४ वाजता त्यांचे निधन झाले.आपल्या मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी मोठा मित्र परिवार जमविला होता.त्यांच्यामागे संकेत व सार्थक ही दोन मुले,पत्नी असा परिवार आहे.संवत्सरचे वसंतराव बादशहा परजणे व कै.त्र्यंबकराव परजणे यांचे ते पुतणे होते तर सेवानिवृत्त शिक्षक रमेशराव भोकरे गुरुजी यांचे ते जावई होते.
कै.नितीन परजणे यांच्या अंत्यविधीसमयी संवत्सर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विवेक परजणे,संवत्सर पंचक्रोशीतील अनेक मित्रपरिवार,नातेवाईक,विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.अंत्यविधीप्रसंगी दिलीप ढेपले व ह.भ.प.रामदास बोठे आदीनी श्रध्दांजली वाहिली आहे.गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे,उपसरपंच विवेक परजणे आदींनी दुःख व्यक्त केले आहे.



