जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
धार्मिक

विश्वाची निर्मिती भगवान शिवशंकर यांच्या पासून झाली-भालुरकर महाराज

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(शिवाजी गायकवाड)

विश्वाची निर्मिती भगवान शिवशंकर यांच्या पासून झाली असून तो चक्रवर्ती असून भोळा असल्याचे प्रतिपादन ह.भ.प.शिवाजी महाराज भालुरकर यांनी नुकतेच कोपरगाव तालुक्यातील संवत्सर येथे एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

संवत्सर या ठिकाणी शुंगेश्वर महादेव मंदिर असून गोदावरी काठी आश्रम असलेल्या शुंगऋषींना पुत्र प्राप्तीसाठी अयोध्येत “पुत्र कामेष्ठी” यज्ञासाठी राजा दशरथ यांनी पाचारण केले होते.त्यांच्या या यज्ञानेच त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले असल्याचे मानले जाते.या ठिकाणाला आजही मोठे पवित्र मानले जाते.या ठिकाणी प्रत्येक शिवरात्रीस मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

माघ महिन्यातील माघ कृष्ण चतुर्दशी तिथीला हिंदू समाजात महाशिवरात्र म्हणतात.प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीयुक्त चतुर्दशीला शिवरात्री असते.मात्र माघ महिन्यातील शिवरात्रीचा महिमा मोठा आहे.महाशिवरात्रीच्या दिवशी सर्व हिंदू बांधव उपवास करतात.भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास संपवतात.उत्तर भारतात हाच दिवस फाल्गुन महिन्यात गणला जातो तर इंग्रजी महिन्याप्रमाणे हा दिवस फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येतो.संपूर्ण भारतात या दिवशी मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कोपरगाव तालुक्यात गोदावरी काठी अनेक तीर्थ क्षेत्र असून या ठिकाणी शिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.संवत्सर या ठिकाणी शुंगेश्वर महादेव मंदिर असून गोदावरी काठी आश्रम असलेल्या शुंगऋषींना पुत्र प्राप्तीसाठी अयोध्येत “पुत्र कामेष्ठी” यज्ञासाठी राजा दशरथ यांनी पाचारण केले होते.त्यांच्या या यज्ञानेच त्यांना पुत्र रत्न प्राप्त झाले असल्याचे मानले जाते.या ठिकाणाला आजही मोठे पवित्र मानले जाते.या ठिकाणी प्रत्येक शिवरात्रीस मोठ्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.यावर्षीही याठिकाणी ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांचे “शिव भोळा माझा चक्रवर्ती,त्याचे पाय माझे चित्ती”या अभंगावर सुश्राव्य कीर्तन आयोजित केले होते त्यावेळी ते बोलत होते.
सदर प्रसंगी गोदावरी नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे,सरपंच सुलोचना ढेपले,उपसरपंच विवेक परजणे,शिवसेनेचे तालुकाध्यक्ष शिवाजी ठाकरे,बाळासाहेब गायकवाड,संजीवनी कारखाण्याचे संचालक फकिरा बोरणारे,अर्जुन तांबे,लक्ष्मणराव परजणे,भजनी मंडळाचे सदस्य नामदेव पावडे,धर्मा पवार,मोकाटे महाराज,लकारे महाराज,सुभाष बिडवे,गोकुळ गंगूले,भाऊसाहेब ढेपले,भिका कलाल,बोरणारे,लहानु गुंड,बाबासाहेब खर्डे,श्री दैने आदी मान्यवरांसह भोजडे,वारी,कान्हेगाव,दहिगाव बोलका,शिंगणापूर,कोपरगाव,शिर्डी आदी ठिकाणाहून भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

त्यावेळी पुढे बोलताना तें म्हणाले की,शिव हा भोळा असून तो भक्तांच्या हाकेला धावून येणारा आहे.भगवान शिवांचा महिमा तिन्ही लोकांत वर्णिला जात असून त्यांची पूजा थेट प्रभू रामचंद्र करत असत.त्यानीच दक्षिणेत लंकेच्या स्वारी प्रसंगी रामेश्वराची स्थापना केली आहे.शिव तत्व हे चराचरात समाविष्ट असून त्याच्या पासूनच चौदा ज्योतिर्लिंगाची स्थापना झाली आहे.गंगेला जेंव्हा मृत्यु लोकात यायची ईच्छा झाली त्या वेळी तिने शिवाची आराधना केली होती.अन्य देवदेवतांना माता पिता होते.मात्र शिवांना माता पिता असल्याचा उल्लेख धर्मग्रंथात मिळत नाही.शिव माणसाला बळ येतो आणि त्याला अहंकार झाला की ते काढूनही घेतो असे सांगून त्यांनी वीर हनुमान व अर्जुन यांचे उदाहरण दिले आहे.

शिवरात्री निमित्त पहाटे चार वाजता गंगास्नान घालण्यात आले आहे.आरती,रुद्राभिषेक तर पूजा करण्यात आली होती.तर सकाळी दहा वाजता ह.भ.प.शिवाजी महाराज भालूरकर यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते.तर सदर प्रसंगी संतोष वाघ,रमेश जिरे,अनिल शिरसाठ,भुपेश वाकचौरे,प्रशांत भालके,अजिंक्य वाघ,विश्वजित कदम,आदींनी महाप्रसादाचे आयोजन केले होते.तर सदर यात्रेनिमित्त भेळ,खाऊ,खेळणी आदींची दुकाने मोठ्या उत्साहात थाटली होती.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close