जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

केबल काढण्याच्या कारणावरून जीवे मारण्याची धमकी,कोपरगावात गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळें ग्रामपंचायत हद्दीत फिर्यादी महिला आपल्या आईच्या घरी आलेली असताना तिने रस्त्यातील विद्युत केबल काढण्यास सांगितल्याचा राग येऊन आरोपी दत्तात्रय विश्वनाथ गवळी,अविनाश दत्तात्रय गवळी,गौरव दत्तात्रय गवळी,गणेश सुरेश गवळी,काशिनाथ साहेबराव गवळी आदींनी धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा संगीता विजय वाजे या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी महिला हि सिन्नर तालुक्यातील दुबेरे येथील सासर व देर्डे-कोऱ्हाळे येथील माहेर असलेली आहे.ती काही कामानिमित्त आपल्या माहेरी आलेली असताना दि.२६ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तीस एक विद्युत वाहक केबल रस्त्यात दिसली असता तिने ती आपल्या आरोपी नातेवाईकांना काढून घेण्यास सांगितले असता हा प्रताप घडला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला हि सिन्नर तालुक्यातील दुबेरे येथील सासर व देर्डे-कोऱ्हाळे येथील माहेर असलेली आहे.ती काही कामानिमित्त आपल्या माहेरी आलेली असताना दि.२६ मे रोजी रात्री ९.३० वाजेच्या सुमारास तीस एक विद्युत वाहक केबल रस्त्यात दिसली असता तिने ती आपल्या आरोपी नातेवाईकांना काढून घेण्यास सांगितले असता त्याचा आरोपी दत्तात्रय विश्वनाथ गवळी,अविनाश दत्तात्रय गवळी,गौरव दत्तात्रय गवळी,गणेश सुरेश गवळी,काशिनाथ साहेबराव गवळी आदींना राग आला त्यांनी गैरकायद्याची मंडळी एकत्र करून त्या महिलेला धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचा गुन्हा संगीता विजय वाजे या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने खळबळ उडाली आहे.
या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१९२/२०१ भा.द.वि.कलम ३४३,१४७,१४९,३२३,५०४,५०६ अन्वये वरील पाच आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.सतीश भताने हे करीत आहेत.दरम्यान या घटनेबाबत आरोपीनी या माहिलेविरुद्ध आदल्या दिवशी याच पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.आरोपी हे महिलेचे भाऊ असल्याचे समजते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close