जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

लक्झरीने दुचाकीस उडवले,एक जखमी,कोपरगावात गुन्हा

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत चंद्रकांत जपे यांच्या वस्ती जवळ शिर्डी कडून कोपरगाव कडे भरधाव वेगाने जाणाऱ्या राजस्थान मधील लक्झरी बसने (क्रं.आर.जे.२७ पी.बी.९९६६) होंडा ऍक्टिव्हा (क्रं.एम.एच.१७ सी.डी.२०९६) या दुचाकीस जोराची धडक दिली असून त्यावर दुचाकी चालक महिला अंजली संजय कुलकर्णी (वय-४५) या गंभीर जखमी झाल्या आहे.या बाबत फिर्यादी सुनील चंद्रकांत कुलकर्णी रा.सावळीविहिर ता.कोपरगाव यांनी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

जखमी महिला अंजली कुलकर्णी या गुरुवार दि.०५ मे रोजी सायंकाळी ०५.१० वाजेच्या सुमारास या आपल्या होंडा ऍक्टिव्हा या दुचाकीवरून सावळीविहिर कडून कोपरगाव कडे जात असताना त्याच मार्गावरून वरील क्रमांकाच्या लक्झरी बसने त्याना मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.ती धडक इतकी जोराची होती की.त्या आपल्या दुचाकींसह स्वतः पूर्ण त्या लक्झरी बस खाली दाबल्या गेल्या होत्या.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”जखमी महिला अंजली कुलकर्णी या गुरुवार दि.०५ मे रोजी सायंकाळी ०५.१० वाजेच्या सुमारास या आपल्या होंडा ऍक्टिव्हा या दुचाकीवरून सावळीविहिर कडून कोपरगाव कडे जात असताना त्याच मार्गावरून वरील क्रमांकाच्या लक्झरी बसने त्याना मागील बाजूने जोराची धडक दिली आहे.ती धडक इतकी जोराची होती की.त्या आपल्या दुचाकींसह स्वतः पूर्ण त्या लक्झरी बस खाली दाबल्या गेल्या होत्या.त्या गंभीर रित्या जखमी झाल्या असून त्यांना नाशिक येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे.त्या घटनेत त्या अजूनही शुद्धीत आलेल्या नाहीत.जखमी महिला या सावळीविहिर येथील ‘अगत्य रिसॉर्ट’च्या संचालिका असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी सुनील कुलकर्णी यांनी सदर लक्झरी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी आपल्या दप्तरी गु.र.क्रं.१२१/२०२२ भा.द.वि.कलम २७०,३३७,३३८ ४२७,मोटार वाहन कायदा कलम १८४ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.ए.एम.दारकुंडे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close