आरोग्य
तिर्थंकर मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटलच्या वतीने आरोग्य निदान शिबिरास प्रारंभ
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगांव शहरांतील तिर्थंकर मल्टीस्पेशालिटी हाॕस्पीटलच्या विदयमाने डाॕ.अमोल अजमेरे व डाॕ.रविंद्र गायकवाड यांचे मार्गदर्शना खाली श्रीमान गोकुळचंद विदयालयांतील शिक्षकांसाठी आरोग्य निदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.यामध्ये श्रीमान गोकुळचंद विदयालय परीवार तील १०० शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे रक्त,तपासणी,इ.सी.जी,रक्तदाब,आदी रोगांचे तीन दिवस निदान करुन त्यावर उपचार करण्यात येणार आहेत.
राज्यासह कोपरगाव तालुक्यात कोरोना साथ सुरु असून आगामी काळातही नागरिकांना आरोग्याबाबत सतर्क राहावे लागणार आहे.त्यामुळे नागरिकांना आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे या पार्श्वभूमीवर हे शिबिर तीर्थकर हॉस्पिटलचे संचालक डॉ.अमोल अजमेरे व त्यांचे सहकारी डॉ.रवीन्द्र गायकवाड आदींनी आयोजित केले आहे.
सदर प्रसंगी विदयालयाचे चेअरमन चंद्रकांत ठोळे,कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे,सहसचिव सचिन अजमेरे,श्री.गो.विदयालयांचे उपमुख्याध्यापक आर.ई.पाटील पर्यंवेक्षक आर.बी.गायकवाड डी.व्ही.तुपसैंदर,एन.के.बडजाते,जाधव ई.एल,शिरसाळे एस.एन,गवळे वाय.के,गोरे एस.डी,आदी शिक्षक,शिक्षिका सुरक्षित अंतर पाळुन उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.अमोल अजमेरे यांनी केले तर प्रारंभी स्व.जयकुमार अजमेरे यांच्या प्रतिमेचे पुजन डाॕ.रविंद्र गायकवाड यांच्या शुभहस्ते करण्यात आले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यालयाचे मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार विदयालयाचे जेष्ठ शिक्षक तुपसैंदर डी.व्ही यांनी मानले.हे आरोग्य शिबिर शनिवार दिनांक १७ जुलै पर्यत सुरु आहे.