गुन्हे विषयक
तीन दुचाकीस्वार जेरबंद,कोपरगाव शहर पोलिसांची कारवाई
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहर व तालुक्यात दुचाकीचोरीबाबत थैमान घालणाऱ्या दुचाकीस्वारांचा कोपरगाव शहर पोलिसांना योगायोगाने सुगावा लागला असून तीन चारी या ठिकाणी गस्तीवर असलेल्या पथकाला एक आरोपी किरण दिलीप बेंडकुळे (वय-२५) हा संशयित रित्या फिरताना आढळून आला त्याला पोलीसांनी ताब्यात घेऊन आपला हिसका दाखवला असतां त्याने आपल्या ताब्यातील लाल रंगाची बजाज प्लॅटिना (क्रं.एम.एच.१७ सी.जी.२६२२) धारणगाव रोड, सोनार वस्ती येथून चोरी केलेली असल्याचे सांगितल्यावर त्याला अटक करून पोलीस ठाण्यात आणल्यावर त्याच्या अन्य दोन गणेश उत्तम पवार ,वय-२३) रा.कोळगाव माळ ता.सिन्नर व रोहित बाबासाहेब मोकळं (वय-२०) रा.सदर या साथीदारांना अटक केली असून त्यांच्याकडून तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.पोलिसांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
कोपरगाव शहर व तालुक्यात गेले अनेक दिवस दुचाकीस्वारांनी उच्छाद मांडला असून अनेकांनी आपल्या दारात उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी,दुकानाबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी यांचा परस्पर पोबारा केल्याच्या अनेक घटना घडूनही चोर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होताना दिसत होते.त्यामुळे सामान्य नागरिक व दुचाकीस्वार हैराण झाले होते.अनेकांनी आपल्या दुचाकी चोरीचे गुन्हेही पोलीस ठाण्यात देऊन उपयोग होत नव्हता.मात्र दि.११ जुलै रोजी तीन चारी येथे रात्रीच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या गस्ती पथकाला हे यश सतर्कतेमुळे मिळाले आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहर व तालुक्यात गेले अनेक दिवस दुचाकीस्वारांनी उच्छाद मांडला असून अनेकांनी आपल्या दारात उभ्या करून ठेवलेल्या दुचाकी,दुकानाबाहेर उभ्या केलेल्या दुचाकी यांचा परस्पर पोबारा केल्याच्या अनेक घटना घडूनही चोर मात्र पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार होताना दिसत होते.त्यामुळे सामान्य नागरिक व दुचाकीस्वार हैराण झाले होते.अनेकांनी आपल्या दुचाकी चोरीचे गुन्हेही पोलीस ठाण्यात देऊन उपयोग होत नव्हता.दरम्यान कोपरगाव शहर पोलिसांची नुकतीच कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर गस्त चालू असताना कोकमठाण ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या तीन चारी परिसरात एक तरुण दि.११ जुलैच्या रात्रीच्या सुमारास संशयित रित्या आपल्या ताब्यातील दुचाकींजवळ उभा असलेला दिसला. पोलीस नाईक अर्जुन एम.दारकुंडे व त्यांचे सहकारी पो.कॉ.जी.एस.मैड यांना त्याचा संशय आला.त्यांनी आपली चार चाकी उभी करून सम्बधित तरुणांची चौकशी केली असता त्याची देहबोली काहीतरी लपवत असल्याचे या कर्मचाऱ्यांचे लक्षात आले.त्यांनी त्याला फैलावर घेतल्यावर तो सुतासारखा सरळ झाला व त्याने आपल्या ताब्यातील बजाज कंपनीची वरील दुचाकी हि आपण धारणगाव रोड सोनार वस्ती येथून चोरल्याचे कबूल केले आहे.त्याला हाती सापडल्यावर शहर पोलिसांना कामाची चीज आपल्या हाती लागल्याने समाधान मिळाले पण तेवढ्यावर थांबून उपयोग नव्हता.त्यांनी त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास सुरु केला असता त्याने त्याच्या ताब्यातील दुचाकी हि कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्रं.२२७/२०२१ अन्वये चोरलेली असल्याचे उघड झाले आहे.त्यानुसार पोलिसांना घटनेचे गांभीर्य समजल्यावर त्यांनी अन्य सहकाऱ्यांचा शोध सुरु केला असता त्यात त्याने आपल्या अन्य सहकाऱ्यांचे पितळ उघडे पाडले आहे.त्यात त्याने कोळगाव माळ ता.सिन्नर येथील चोरटे गणेश उत्तम पवार ,वय-२३) व रोहित बाबासाहेब मोकळं (वय-२०) रा.यांची नावे घेतली आहे.त्याच्या अन्य दोन साथीदारांना अटक केली आहे.त्यांनी दि.२९ मे रोजी जनार्दन स्वामी हॉस्पिटल येथून ते पढेगाव रोड संवत्सर शिवार येथून सुमारे ५० हजार किमतीच्या दोन दुचाकी चोरल्या असल्याचे कबुल केले आहे. त्यांच्याकडून वरील प्लॅटिनासह तीन दुचाकी जप्त केल्या आहेत.त्यातील एक १५ हजार रुपये किमतीची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर (क्रं.एम.एच.१७ ए.आर.९९०) तर अन्य होंडा कंपनीची ड्रीम युगा (क्रं.एम.एच.१७ ए. डब्ल्यू.४९९७) आदी दुचाकी जप्त केल्या आहेत.पुढील तापास पोलसी निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अर्जुन दारकुंडे हे करीत आहेत.पोलिसांच्या या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.