शैक्षणिक
इंडियन टॅलेंट ओलंपियाड मध्ये…या संस्थेचा दबदबा

न्युजसेवा
कोपरगाव -(प्रतिनिधी)
इंडियन टॅलेंट ओलंपियाड तर्फे देशपातळीवर गणित,विज्ञान,इंग्रजी,कला,संगणक इंडियन टॅलेंट ओलंपियाड परीक्षा घेण्यात येते.नुकताच या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून या परीक्षेत आत्मा मालिक सेमी इंग्लिश मिडीयम गुरूकुल हे पुन्हा अव्वल स्थानी आले आहे.गुरूकुलाचे ७ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले.१३ विद्यार्थ्यांना एक्सलन्स अवॉर्ड,३९ विद्यार्थी गोल्ड मेडल अवॉर्ड,२६ विद्यार्थी सिल्वर मेडल अवॉर्ड,२४ विद्यार्थी ब्राँझ मेडल अवॉर्ड प्राप्त झाल्याची माहिती प्राचार्य निरंजन डांगे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली आहे.

“आत्मा मालिक पॅटर्नचे हे यश असल्याचे सांगितले आहे.याअंतर्गत अभ्यासक्रमाचे सुक्ष्म नियोजन,तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर,तयारी शिबीराचे आयोजन,नैदानिक चाचण्या,सराव परीक्षा,तज्ञांचे मार्गदर्शन विद्यार्थी व शिक्षकांचे परीश्रम यामुळे हे यश साकारले आहे”-नंदकुमार सुर्यवंशी,अध्यक्ष,जंगली महाराज आश्रम ट्रस्ट,कोकमठाण.
संपूर्ण भारतातील इयत्ता ०१ ते इयत्ता १० पर्यंतच्या विद्यार्थ्यांचे ज्ञान, तर्क क्षमता आणि समजण्याच्या पातळीचे मूल्यांकन करण्यास मदत करते.इंडियन टॅलेंट ऑलिम्पियाड परीक्षांसाठी आतापर्यंत आत्मा मालिकसह ३१ हजार ५७३ हून अधिक शाळांनी नोंदणी केली होती आणि लाखो विद्यार्थ्यांनी संपूर्ण भारतातील ऑलिम्पियाड परीक्षांमध्ये भाग घेतला होता.त्याचा निकाल नुकताच हाती आला आहे.यामध्ये गणित ओलंपियाड मध्ये शिवराज पाटिल राज्यात चौथा,श्रीजीत इंगोले राज्यात पाचवा,शुभम जाधव राज्यात सहावा,सायन्स ओलंपियाड मध्ये दुर्गेश धनवटे राज्यात पाचवा,कला ओलंपियाड मध्ये सिद्धांत जाजू राज्यात तिसरा,समर्थ खेडकर राज्यात चौथा,हार्दिक बर्वे राज्यात पाचवा क्रमांक मिळवून मोठे यश मिळविले आहे.
विदयार्थ्यांना प्राचार्य निरंजन डांगे विभाग प्रमुख अनिल सोनवणे,सचिन डांगे,पयवेक्षक नयना शेटे,गणेश रासने,विषय शिक्षक अमोल कर्डिले,गुरुराज सज्जन,मोरेश्वर गायकवाड,प्रसाद करडे,अनिता वाणी,रुपाली होन अथर्व फाऊंडेशनचे शिवम तिवारी,शिक्षक रोहिणी होन,अनुशिखा आस्ताना,प्रियांशू कुमार,हरीश साठे यांचे मार्गदर्शन लाभले होते.
यशस्वी विद्यार्थ्यांचे अध्यक्ष नंदकुमार सुर्यवंशी,उपाध्यक्ष बाळासाहेब गोर्डे,सरचिटणीस हनुमंतराव भोगळे,कोषाध्यक्ष विठठलराव होन,विश्वस्त प्रकाश गिरमे,प्रदिपकुमार भंडारी,शालेय व्यवस्थापक सुधाकर मलिक वसतिगृह व्यवस्थापक साईनाथ वर्पे आदींनी अभिनंदन केले आहे.