आरोग्य
कोपरगावात आजही मोठी मृत्यू संख्या,मात्र रुग्णवाढ रोडावली
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १० हजार ३५० बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १ हजार २३६ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १५६ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.५१ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४२ हजार ९३८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ७१ हजार ७५२ इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २४.१० टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ०९ हजार १२१ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८८.१३ टक्के असल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०२ लाख ०६ हजार ६२९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २३ हजार ६६१ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ८० हजार ६५२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार ३१५ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.
राज्यातील रुग्णवाढ प्रथमच पन्नास हजारांच्या आत आली असून कोपरगावही त्याला अपवाद नाही.कोपरगाव शहरात व ग्रामीण भागात टाळेबंदीचा साकारात्मक परिणाम आता येऊ लागले आहे.परिणामस्वरूप रुग्णवाढ रोडावली असून हि नक्कीच उत्साहवर्धक बाब आहे.मात्र मृत्युदर मात्र मोठ्या प्रमाणावर वाढला असून त्यात तरुणाईचा भरणा चिंता निर्माण करणारा आहे.त्यामुळे आगामी काळात प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
दरम्यान उद्या दि.१२मे रोजी ४५ पेक्षा अधिक वयोगटातील ज्या लाभार्थींनाी दि.१७ मार्चच्या आधी पहीला डोस घेतला आहे.त्यानांच “कोव्हीशिल्ड”चा दुसरा डोस देण्यात येणार आहे.त्या सर्व लाभार्थ्यांनी ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथे सकाळी ०८ वाजता टोकण वाटप करण्यात येणार आहे.एकूण १२० डोस देण्यात येणार असून अन्य नागरिकांनी चौकशीसाठी गर्दी करू नये असे आवाहन डॉ.कृष्णा फौलसुंदर यांनी नुकतेच केले आहे.
दरम्यान काल नजर चुकीने शहरात लसीचा डोस मिळणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते त्यात तारखेच्या नजरचुकीच्या घोळामुळॆ नागरिकांना व प्रशासनाला त्रास सहन करावा लागला त्याबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.