जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगावात कोरोना विरुद्ध एकजुटीची गरज-पालिकेच्या या पदाधिकाऱ्यांचे आवाहन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगांव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यातील कोरोनाची रुग्णसंख्या कमी करण्यासाठी प्रशासन व नागरीक एकजुटीने प्रयत्न करत असूनही समाधानकारक यश मिळणे दुरापास्त ठरत आहे त्याला कारण कोरोनाची तापासनी बाधित आल्यानंतर कोविड केंद्रात दाखल न होता अनेकजण आपापल्या घरीच विलगीकरणात राहातो असे सांगून कोविड सेंटरला जाण्याची टाळाटाळ करत आहे त्यामुळे या लढाईत विविध सामाजिक संस्था,कार्यकर्ते,नागरिकांचा सहभाग आवश्यक असल्याने प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

“कोपरगाव शहरात काहीजण तर कोरोना बाधित असूनही खुशालचेंडू प्रमाणे रस्त्यावर फिरतांना दिसतात.काहीजण अहवाल येईपर्यंतही घरात थांबत नाहीत.घरच्यांनाही न जुमानता शहरात फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे सर्वांनाच घातक ठरत आहेत.प्रशासनालाही काही मर्यादा आहेत.मनुष्यबळही कमीच आहे.नगरपरिषद,पोलीस व महसूल विभाग आणि आरोग्य यंत्रणेतील काहीजणही कोरोनाग्रस्त झालेले आहेत या पार्श्वभूमीवर सर्वाच्या सहकार्याची व मदतीची गरज आहे”-नगराध्यक्ष विजय वहाडणे,कोपरगाव नगरपरिषद.

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे ३२७ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत २७ अँटीजन तपासणीत ९३,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत ३७ असे एकूण अहवालात एकूण १५७ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १०३ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव शहरात एक महिला वय-३५ निधन झाले आहे तर तालुक्याच्या ग्रामीण भागात पाच मृत्यू झाले असून त्यात येसगाव येथील एक ६८ वर्षीय महिला,माहेगाव देशमुख येथील ३७ वर्षीय महिला तर कोकमठाण येथील ४५ तर टाकळी येथील ६० वर्षीय पुरुष,तीळवणी येथील ५४ वर्षीय महिला आदींचा समावेश आहे.त्यामुळे प्रशासन हादरले असून त्यावर अंतर्मुख झाले असून त्यांची काळजी वाढली आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी हे प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.

त्यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,”काहीजण तर कोरोना बाधित असूनही खुशालचेंडू प्रमाणे रस्त्यावर फिरतांना दिसतात.काहीजण अहवाल येईपर्यंतही घरात थांबत नाहीत.घरच्यांनाही न जुमानता शहरात फिरून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढविणारे सर्वांनाच घातक ठरत आहेत.प्रशासनालाही काही मर्यादा आहेत.मनुष्यबळही कमीच आहे.नगरपरिषद,पोलीस व महसूल विभाग आणि आरोग्य यंत्रणेतील काहीजणही कोरोनाग्रस्त झालेले आहेत.

अशावेळी सर्व आजी माजी नगरसेवक व समाजसेवकांनी दररोज किमान दोन तास तरी आपापल्या प्रभागात-विभागात फिरून कुणाच्याही घरात न जाता, सुरक्षित अंतर ठेवून चौकशी व आरोग्यासाठी सूचना करणे गरजेचे आहे.एखाद्या घरात कोरोना रुग्ण असूनही कोविड केंद्र किंवा रुग्णालयात जात नसेल तर त्वरित तशी माहिती शासकिय यंत्रणेला द्यायला हवी तरच रुग्णसंख्या कमी होऊ शकते.असे न केल्यास कितीही दिवस शहर व तालुका टाळेबंदी जाहीर केली तरी चांगले परिणाम मिळणार नाहीत.सर्व व्यवहार सुरळीत करायचे असतील तर आपल्या सर्वांना कोरोनाविरुद्धच्या संघर्षात प्रत्यक्ष भाग घ्यावा लागणार आहे. नुकतेच सेनेचे माजी शहर प्रमुख भरत मोरे यांनी प्रभागात फिरून नाविन्यपूर्ण पद्धतीने जनजागृती करून चांगले पाऊल उचलले असल्याचे कौतुक करून त्यांनी सर्वांनी नियम पाळून जनसंपर्क वाढवून जनतेला कोरोना विरुद्ध जागृत केले पाहिजे असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close