आरोग्य
…या शहरात महिलांसाठी मोफत शिबीर
न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात प्रथमच महिलांच्या विविध त्वचा विकारांसंबंधी मुंबई येथील महिला त्वचारोग तज्ञ डॉ.विशाखा धोर्डे मातेले यांचे मार्फत निशुल्क वैद्यकीय शिबिराचे आयोजन रविवार दि.१४ एप्रिल सकाळी ०८.३० वाजता धारणगाव रोड,धोर्डे बिल्डिंग येथे आयोजित केले असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
सदर पत्रकात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”महिलांना अनेक त्वचा विकारांना सामोरे जावे लागते अनेक महिलांना त्वचा विकार भेडसावतात परंतु लाजेपोटी अनेक महिलांची उपचारासंबंधि अनास्था असते.त्यामुळे वेळेत उपचार न घेतल्याने पुढे त्वचा विकारांमुळे गंभीर स्वरुपाचे आजार होण्याची शक्यता असते.दरम्यान अनेक समस्यांना महिलांना तोंड द्यावे लागते.महिलांनी कुठलाही न्यूनगंड न बाळगता या निशुल्क शिबिराचा जास्तीत जास्त संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.विशाखा मातेले यांनी शेवटी केले आहे.
दरम्यान सदर शिबिरात शरीरावरील पांढरे व काळे डाग,कोड अंगावरील पांढरे चट्टे,वांग,सोरायसिस,गजकर्ण,खरुज, इसब,नागवेडा,बैंड,कुठ रोग यासह इतर त्वचेच्या आजारांवर निशुल्क तपासणी केली जाणार आहे महिलांनी केम्पसाठी 7719035336,9604293966 या मोबाईल क्रमांकावर नाव नोंदणी करावी व येताना जुने रिपोर्ट सोबत घेऊन यावे असे आवाहन त्यांनी शेवटी केले आहे.