निवड
कर्मवीर काळे कारखान्याच्या उपाध्यक्षपदी…यांची निवड

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
सहकार क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी कारखान्याचे संचालक डॉ.मच्छिंद्र रंगनाथ बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.

“कर्मवीर शंकरराव काळे व माजी आ.अशोक काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर प्रेम करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे.ही परंपरा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे पुढे चालवत आहे”-डॉ.बर्डे,नूतन उपाध्यक्ष,कर्मवीर काळे सहकारी साखर कारखाना.
कारखान्याचे विद्यमान उपाध्यक्ष दिलीपराव बोरनारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी डॉ.मच्छिंद्र बर्डे यांची संचालक मंडळाच्या झालेल्या बैठकीत एकमताने निवड करण्यात आली आहे.
सदर प्रसंगी कर्मवीर काळे कारखान्याचे सर्व संचालक मंडळ,प्र.कार्यकारी संचालक सुनिल कोल्हे,सचिव बाबा सय्यद,सहसचिव संतोष शिरसाठ व पदाधिकारी उपस्थित होते.तर निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रादेशिक उपसंचालक (साखर) अ.नगर डॉ.प्रविण लोखंडे यांनी काम पाहिले आहे.
यावेळी आपल्या निवडीबद्दल बोलतांना नवनिर्वाचित उपाध्यक्ष डॉ.मच्छिंद्र बर्डे म्हणाले की,”कर्मवीर शंकरराव काळे व माजी आ.अशोक काळे यांनी नेहमीच सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर प्रेम करून त्यांच्यासोबत काम करण्याची संधी दिली आहे.ही परंपरा कारखान्याचे अध्यक्ष आ.आशुतोष काळे पुढे चालवत आहे.