जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

कोपरगाव तालुक्यात कोरोना रुग्णांचे विक्रमी मृत्यू,प्रशासन हादरले !

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.त्यात रोज हजारो कोरोनाच्या रुग्णांची भर पडत आहे.त्याला कोपरगाव शहर व तालुकाही अपवाद नाही.कोपरगावातून आज आलेल्या अहवालात नगर येथे १२६ श्राव तपासणीसाठी पाठवले असून आर.टी.पी.सी.आर.तपासणीत ३४ अँटीजन तपासणीत ८२,खाजगी प्रयोग शाळा तपासणीत १८ असे एकूण अहवालात एकूण १३४ रुग्ण बाधित आढळले आहे.तर १२६ जणांना उपचारानंतर सोडून देण्यात आले आहे तर आज कोपरगाव तालुक्यात सात मृत्यू झाले असून त्यात विवेकानंद नगर येथील एक ६१ वर्षीय पुरुष,निवारा ४४ वर्षीय महिला तर कोळगाव थडी येथील ७६ वर्षीय तर संवत्सर येथील ६० वर्षीय शहरापुर येथील ६० वर्षीय पुरुष,तर ब्राम्हणगाव येथील २६ वर्षीय तरुणांचा समावेश आहे.

रम्यान कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या प्रमाणात मृत्युदर वाढला असून त्यात एकूण बाधित रुग्ण ९ हजार ९८७ तर त्यात सक्रिय रुग्ण १०५० तर आजपर्यंत १४३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे.त्याचा धसका तालुका प्रशासनाने घेतला असून आज सकाळी ोपरगाव शहरात महसूल,पोलिस आणि कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचारी संयुक्तपणे खरेदी विक्री केंद्रावर होणारी गर्दी टाळण्यासाठी सकाळपासूनच रस्त्यावर उतरलेले पहावयास मिळले असून तहसिलदार योगेश चंद्रे,त्यात कोपरगाव शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,आपत्ती व्यवस्थापन समन्वयक सुशांत घोडके,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,आदींचा त्यात समावेश होता.दरम्यान या बाबत नागरिकांनी ‘देर आये,दुरुस्त आये’ या पूर्वीच हि भूमिका घेतली असती तर रुग्णसंख्या लक्षणीयरीत्या कमी झाली असती व मृत्यूदरही मोठ्या प्रमाणावर घटला असता अशी प्रतिक्रिया नोंदविली आहे.

नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ९६ हजार १४७ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २३ हजार ९३४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ७० हजार ००० रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार २१२ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात शासकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close