कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यात कोरोनाचे आजही चार बळी

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यात आज एक अखेर १० हजार १४६ बाधित रुग्ण आढ आढळले असून त्यातील १ हजार १३३ रुग्ण सक्रिय आहे.तर आज पर्यंत १४७ जणांचा बळी गेला आहे.त्याचे प्रमाण टक्केवारीत १.४५ टक्के आहे.तर आज अखेर एकूण ४१ हजार ९६० नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.त्याची दर दहा लाखाला आकडेवारी ०१ लाख ६७ हजार ८४० इतकी आहे.त्याचा बाधित दर हा २४.१८ टक्के आहे.तर आज अखेर उपचारानंतर ८ हजार ८६६ रुग्ण बरे झाले आहे.त्यांचा आकडेवारीत दर ८७.३८ टक्के असल्याची माहिती कोपरगाव गग्रामीन रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी कृष्णा फौलसुंदर यांनी दिली आहे.
नगर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ०१ लाख ९९ हजार ८१९ झाली असून सक्रिय रुग्ण संख्या २४ हजार ४२४ झाली आहे.तर आज अखेर पर्यंत ०१ लाख ७३ हजार १३२ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहे.तर ०२ हजार २५९ रुग्ण आतापर्यंत दगावले आहे.कोरोना संच तूर्त उपलब्ध झालं असले तरी आगामी काळात शासकीय स्तरावरून ते केंव्हा मिळणार याकडे नागिकांचे लक्ष लागून आहे.रुग्णवाढीला उतार आला असला तरी मृत्युदर मात्र धक्कादाक पद्धतीने वाढला आहे.त्यामुळे आता कोपरगाव शहर येत्या १५ मे पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान उद्या दि.१० मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील लाभार्थींना कोव्हॅक्सीनचा पहीला डोस देण्यात येणार आहे त्या सर्व लाभार्थ्यांना ग्रामीण रुग्णालय कोपरगाव येथून फोन केला जाणार आहे.फोन करून बोलावलेल्या व्यक्तींनी लस घेण्यासाठी ग्रामीण रुग्णालय येथे यावे व अन्य कोणीही चौकशीसाठी गर्दी करू नये उद्याचे लसीकरण सत्र पूर्णपणे ऑनलाईन नोंद झाले आहे व तसा संदेश सर्वांना प्राप्त झाला आहे उद्या एकूण २९० डोस देण्यात येणार आहे तरी जनतेने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.फौलसुंदर यांनी शेवटी केले आहे.