जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव शहर वृत्त

…या शहरात डासांचा उच्छाद,फवारणीची गरज !

जाहिरात-9423439946

न्युजसेवा

कोपरगाव -(प्रतिनिधी)

  कोपरगाव शहरात वर्तमान काळात डासांची मोठी संख्या वाढली असून डासांच्या या उच्छेदाने नागरिक हैराण झाले असून अनेक जणांना त्याचा प्रसाद मिळत असून नागरिकांनी कोपरगाव नगरपरिषदेने तात्काळ दास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी केली आहे.

दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांचेशी संपर्क केला असता त्यानी,”शहरात खडकी भाग उपनगर आणि गांधीनगर भागातून डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली असल्याची माहिती दिली आहे.

   कोपरगाव शहर परिसरात उघडे नाले,उघडी गटारे व खोदलेल्या रस्त्यांमुळे डासांचा उपद्रव वाढला आहे.त्यामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.त्यातचवर्तमान काळात उन्हाने कहर केला असून उच्चांकी उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून उन्हाच्या काहीलीमुळे बाहेर झोपण्यास जावे तर त्या ठिकाणी डासांनी हैराण केल्याने नागरिकांना,’ इकडे आड,तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाने शहरात सर्वत्र डास प्रतिबंधक फवारणी करावी अशी मागणी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना केली आहे.त्यातून अनेकांना विविध साथींच्या आजाराचा सामना करावा लागत असून त्यातून अर्थचक्र बिघडत चालले आहे.वर्तमानात नगरपरिषदेत प्रशासन राज असल्याने माजी नगरसेवकांनी हाताची घडी तोंडावर बोट ठेवल्याने नागरिकांची बाजू मांडण्यास कोणी वाली राहिला नाही असे चित्र दिसत आहे.

   दरम्यान याबाबत आमच्या प्रतिनिधीने कोपरगाव नगरपरिषदेचे आरोग्य निरीक्षक सुनील आरण यांचेशी संपर्क केला असता त्यानी,”शहरात खडकी भाग उपनगर आणि गांधीनगर भागातून डास प्रतिबंधक फवारणी सुरु केली असल्याची माहिती दिली असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close