जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सुरेगावात महिलेचा विनयभंग,गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व स्वच्छता विभागात काम करणाऱ्या विवाहित महिलेचा त्याच गावातील आरोपी बाळू ताराचंद मेहेरखांब याने भर चौकात एका किराणा दुकानासमोर विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली असून या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

रात्री नऊच्या सुमारास आरोपीने विलास वाबळे यांच्या किराणा दुकानासमोर या गरीब महिलेचा हात पिरगाळून तीस मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी कृती करून साक्षिदार असलेली तिची आई तिला सोडविण्यास गेली असता तिलाही आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दहशत केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.दरम्यान एका वकील महाशयांच्या बंधुने धाडस करून या महिलेला एका अनर्थापासून वाचविण्यात अहंम भूमिका निभावल्याने या महिलेची अब्रू वाचली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,सुरेगाव ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेली एक सत्तावीस वर्षीय महिला असून ती सफाईचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविते.तथापि त्याच गावातील आरोपी बाळू ताराचंद मेहेरखांब याची तिच्यावर वक्र दृष्टी होती.व तो वारंवार ती महिला ज्या गल्लीत राहत होती त्या गल्लीत जाऊन तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत होता.व त्या गल्लीत काही आक्षेपार्ह लिखाण करून दहशत माजवत होता.मात्र या महिलेच्या घरात कोणी कर्ता पुरुष नसल्याने या आरोपीने या कुटुंबावर दहशत करून त्यांना जगणे नकोसे केले होते.गुरुवार दि.२० ऑगष्ट रोजी रात्री नऊच्या सुमारास आरोपीने विलास वाबळे यांच्या किराणा दुकानासमोर या गरीब महिलेचा हात पिरगाळून तीस मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी कृती करून साक्षिदार असलेली तिची आई तिला सोडविण्यास गेली असता तिलाही आरोपीने लाथाबुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून दहशत केली आहे.व जीवे मारण्याची धमकी दिली आहे.दरम्यान एका वकील महाशयांच्या बंधुने धाडस करून या महिलेला एका अनर्थापासून वाचविण्यात अहंम भूमिका निभावल्याने या महिलेची अब्रू वाचली असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे. त्या नागरिकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.या गुंडापासून वाचल्यावर या माहिलेने व तिच्या आईने या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात मोठे धाडस करून गुन्हा दाखल केला आहे.विशेष म्हणजे हा गुन्हा एका नजीकच्या कारखान्याच्या हौसिंग चाळीत घडली आहे हे विशेष! हा गुन्हा दाखल करताना त्यांना अनेक अडचणी आणण्यात आल्या आहेत.व हा गुन्हा होऊ नये यासाठी अनेक आर्थिक आमिषे दाखविण्यात आली आहे.मात्र आपदग्रस्त महिलेच्या आईने धाडस दाखवून या आरोपीला आपला हिसका दाखवून दिला आहे.या आरोपीने या आधीही अशा अनेक घटना घडविल्याच्या बातम्या आहेत मात्र पैसा आणि राजकीय दहशत यावर त्याने अनेक गुन्हे पचवले असल्याच्या बातम्या आहेत.त्याला स्थानिक राजकीय पुढाऱ्यांची साथ असल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे.त्यामुळे या गुन्ह्यामुळे तालुका पोलिसांची प्रतिमा उंचावली आहे.दरम्यान हा गुन्हा दाखल होऊ नये म्हणून एका महिला अन्यायविरोधी एका कार्यकर्तीनेही आपला हात ओला केला असल्याची माहिती आहे.दरम्यान घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिसानी आपल्या दप्तरी गु.र.नं.३८२/२०२० भा.द.वि.कलम ३५४,३५(अ),(ड),३२३,५०४,५०६,प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close