जाहिरात-9423439946
आरोग्य

कोरोना वाढी पेक्षा,कोरोना मुक्तीचे प्रमाण वाढले

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर व तालुक्यात सलग चार दिवस कोरोना वाढीचा नवनवे उच्चांक गाठत असताना व आजपर्यंत १३ रुग्णांचे निधन झाले असताना आज पुन्हा एकदा कोरोनाने कहर केला असून आज केलेल्या ९७ अँटीजन रॅपिड टेस्ट मध्ये २४ रुग्ण बाधित झाले असल्याची माहिती उपलब्ध झाली असून ६७ संशयीतांचे अहवाल निरंक आले आहे,तर उपचारानंतर २७ जणांना आपल्या घरी जाण्यासाठी मुक्त करून देण्यात आले असून आज कोरोना वाढीपेक्षा कोरोना मुक्तीचे प्रमाण आज वाढले असल्याचे निदर्शनास आले असून हि समाधानाची बाब आढळून आल्याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.कृष्णा फुलसौन्दर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

कोरोना विषाणूने जगभर कहर उडवून दिला आहे.देशभरात आज ०६ हजार ३५४ रुग्णांची वाढ होऊन बाधित रुग्णांचा आकडा ३१ लाख ७१ हजार २३५ वर गेला आहे व कोरोना बाधित नागरिकांच्या मृत्यूची संख्या ५८ हजार ५७६ वर जाऊन पोहचली आहे तर राज्यात बाधित रुग्णांचा आकडा ०६ लाख ९३ हजार ३९८ वर जाऊन पोहचला आहे तर राज्यात कोरोना बाधितांचा मृत्यू २२ हजार ४६५ वर जाऊन पोहचला आहे.

नगर जिल्ह्यात बाधित रुग्णांचा आकडा १६ हजार ८३० वर जाऊन पोहचला आहे.तर आता पर्यंत २३६ जणांनी आपले प्राण देऊन किंमत चुकवली आहे.कोपरगाव तालुक्यातील १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे.गत चार दिवसात सलग प्रतिदिन मृत्यूची नोंद होत आहे.आज आलेल्या यादीत शहरात १८ तर ग्रामीण भागात ६ रुग्ण बाधित निघाले असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

दरम्यान आज आलेल्या बाधित रुग्णांत महादेवनगर पुरुष (वय-१८),संजयनगर पुरुष (वय-४६),महिला-(वय४०),सुभद्रानगर पुरुष (वय-५०),येवला रोड महिला (वय-९०), इंदिरा पथ पुरुष (वय-४४),समतांनगर पुरुष (वय-५५,५१), महिला (वय-५०,३०),बागुल टॉवर (पुरुष वय-५६), ब्रिजलाल नगर पुरुष (वय-२५), धरणगाव रोड पुरुष (वय-४३), महिला (वय-६७),श्रद्धा नगरी पुरुष (वय-२५), महिला (वय-२०) बाजार तळ पुरुष (वय-३०),सुभाष नगर पुरुष (वय-६५),तर तालुक्यात मुर्षातपुर पुरुष (वय-२०),महिला (वय-४६),टाकळी पुरुष (वय-१६),कोकमठाण दोन महिला प्रत्येकी (वय-३५),संवत्सर पुरुष (वय-२८) आदींचा समावेश आहे.

दरम्यान आज कोपरगाव तालुक्यात एकूण बाधित रुग्णांची संख्या ७०९ इतकी झाली आहे.त्यात १७६ रुग्ण सक्रिय आहेत,तर आज एकाची वाढ होऊन आतापर्यंत १४ जणांचे कोरोना साथीने निधन झाले आहे.आजपर्यंत कोपरगाव तालुक्याचा मृत्युदर १.९७ टक्के आहे.आतापर्यंत ०३ हजार ३६९ जणांचे श्राव तपासले आहेत यातून बाधित रुग्णांचा दहा लाखाला १३ हजार ४७६ इतका आढळला आहे.तर बाधित रुग्ण दर २१.०४ असा आढळला आहे तर आतापर्यंत कोरोनातून उपचारानंतर बरे झालेल्या रुग्णाची संख्या ४९६ इतकी झाली आहे.टक्केवारीत हा दर ६९.९५ टक्के झाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close