जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कुंभारीतील “त्या”तलाठ्यावर अखेर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत असलेला तलाठी याने कोपरगाव येथील वाळूच्या पकडलेल्या वाहनावर कारवाई करू नये या साठी कोपरगाव येथील तक्रारदार यांचेकडून पाच हजारांची लाच घेताना काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास त्यांना नगर येथील लाच प्रतिबंधक विभागाने पाच हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले होते त्यावर अखेर आमच्या प्रतिनिधीने बातमी दिल्यावर संबंधित तलाठी सुनील मच्छीन्द्र साबणे (वय-५०) यांचेवर रात्री १०.३० वाजेच्या सुमारास गुन्हा दाखल झाला आहे.या बाबत कारवाई करणाऱ्या पथकाने त्या लाच घेतानाच्या प्रसंगाचे चलचित्रण केले आहे.

या प्रकरणी तलाठी सुनील साबणे हा पाच हजारांचा मासिक हप्ता आपल्या कार्यालयात घेत असताना पकडला गेला मात्र त्या नंतर लाचलुचपत विभागाचे अधिकारी नजीक असल्याचे लक्षात आल्याने त्याने सदरची रक्कम फेकून देण्यासाठी लघुशंकेच्या बहाण्याने कार्यालयाच्या मागे जाऊन प्रयत्न केला असताना त्याच्या मागावर असलेल्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहात पकडले होते.दरम्यान तालुक्यातील तलाठी फेरफार नोंदी,विहीर नोंदी,वारस नोंदी करताना बऱ्याच वेळा नागरिकांना आर्थिक पिळवणूक करण्यासाठी अनेक वेळा हेलपाटे मारण्यास भाग पाडत असल्याच्या मोठ्या प्रमाणावर तक्रारी आहे.

कोपरगाव तालुक्यात अवैध वाळू उपसा करण्यास जिल्हाधिकांऱ्यानी प्रतिबंध केलेला आहे.व वाळूचे अधिकृत लिलाव झालेले नाही.मात्र तरीही कोपरगाव तालुक्यातून पूर्वमुखी वाहणाऱ्या गोदावरी नदीतून वाळूचोरांकडून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा सुरु आहे.या बाबत वरिष्ठ अधिकारी कानाडोळा करत असल्याची विश्वसनिय माहिती आहे.या बाबत अनेकांनी तक्रारी करूनही उपयोग झालेला नाही.महसूल व पोलीस अधिकारी यांची अभद्र युती आकाराला आल्याने वाळू चोरांना पुन्हा सुगीचे दिवस आले आहे.वाळूला नजीकच्या महानगरात प्रचंड मागणी व भाव मिळत असल्याने वाळूचोरांचे व हप्ते घेणाऱ्या अधिकाऱ्यांचे सध्या कोट कल्याण सुरु आहे.त्यासाठी त्यांना संरक्षण मिळण्यासाठी तलाठी,मंडलाधिकारी,वरिष्ठ तालुकास्तरीय महसूल अधिकारी यांना वहानधारकाकडून प्रतिवाहन हप्ता द्यावा लागतो यात मोठा मलिदा मिळत असल्याने अधिकारी हप्ता देणाऱ्या वाहनाकडे दूर्लक्ष करत आहे.कोपरगावातील एका नागरिकाने आपल्या ट्रॅक्टरचा हप्ता वाढीव मागितल्याने वादंग झाल्याने तक्रारदाराने नाशिक येथील लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालायकडॆ तक्रार दाखल केली होती.त्यातून नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या पोलीस निरीक्षक मृदुला नाईक,सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्ज्वल कुमार पाटील,पो.ह. कुसारे,सचिन गोसावी,पो.ना.प्रवीण महाजन,चा.पो.ना.दाभोळे यांच्या पथकाने हा छापा दुपारी दीड वाजेच्या सुमारास टाकला होता.व पाच हजार रुपये लाच घेताना त्याचे चलचित्रण केले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close