जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन,एकावर गुन्हा

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव-(प्रतिनिधी)

राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूची साथ चालू असल्याचे माहिती असताना व जिल्हाधिकऱ्यांचे आदेश असतानाही आपल्या तोंडावर मुखपट्टी न बांधता इतरांच्या आरोग्याला धोका पोहचेल अशा पद्धतीने वर्तन केल्या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसानी जेऊर कुंभारी पवार वस्ती येथील आरोपी साईनाथ रामभाऊ जाधव (वय-४२) यांचेवर गुन्हा दाखल केल्याने बेशिस्त नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

कोपरगाव तालुक्यातही कोरोनाचे दोन बळी गेले आहे.व बाधित रुग्णांची संख्या तेरावर गेली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगणे आवश्यक असताना नागरिक अद्यापही तोंडावर मुखपट्टी बांधता प्रवास करत असताना दिसत आहे.हि बाब धक्कादायक आहे.

भारतात कोरोना विषाणूने अद्याप पर्यंत लागण झालेल्या नागरिकांची संख्या २ हजार ८३९ ने वाढून ती ७ लाख २३ हजार १८५ इतकी झाली असून २० हजार १९८ जणांचा मृत्यू झाला आहे.तर राज्यात आज अखेर हि संख्या ०२ लाख ११ हजार ९८७ वर पोहचली आहे.राज्यात या विषाणूने ०९ हजार ०२६ जणांचा मृत्यू झाला आहे.तर नगर जिल्ह्यात हि संख्या ५८६ वर जाऊन पोहचली आहे तर १६ जणांचा मृत्यू झाला आहे.अद्यापही हि संख्या वाढ थांबण्याचे नाव घेत नाही.दिल्ली,मुंबई,ठाणे,पुणे मालेगाव,संगमनेर हि कोरोनाची केंद्रे ठरली आहेत.कोपरगाव तालुक्यातही दोन बळी गेले आहे.व बाधित रुग्णांची संख्या तेरावर गेली आहे.त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.सरकारने स्वाभाविकपणे वाढत्या संक्रमणामुळे केंद्र सरकारने महाराष्ट्रातील टाळेबंदी सहाव्यांदा वाढवून ३० जुलै पर्यंत केली आहे.त्यामुळे नागरिकांनी अधिक सावधानता बाळगणे आवश्यक असताना नागरिक अद्यापही तोंडावर मुखपट्टी बांधता प्रवास करत असताना दिसत आहे.त्यामुळे कोरोना साथीला पोषक वातावरण होत असताना दिसत आहे.नुकतेच कुंभारी येथील ग्रामस्थ साईनाथ जाधव हे अशाच बेशिस्त पद्धतीने प्रवास करताना कोपरगाव पोलिसांना आढळून आले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे फिर्यादी पो.कॉ. संदीप शांताराम काळे (वय-२६) यांनी या आरोपी विरुद्ध शहर पोलीस ठाण्यात आपल्या दप्तरी गुन्हा र.नं.२४७/२०२० भा.द.वि.कलम.१८८(२),२६९,२७०,२९० प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.जी.ससाणे हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close