जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

तरुणांची गळफास,तर महिलेची पाण्यात उडी घेऊन आत्महत्या

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिरसगाव शिवारात आज सकाळी ०९ वाजे पूर्वी शेती व दुग्ध व्यवसाय करत असलेल्या योगेश कैलास जाधव (वय-२९) या तरुणाने वैफल्यग्रस्त होऊन आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.त्यामुळे शिरसगाव सह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

दुसऱ्या घटनेत आज गुरुवार दि. १९ जानेवारी रोजी सकाळी ०७ वाजेच्या पूर्वी कोपरगाव तालुक्यातील सातचारी टाकळी येथील ६० वर्षीय जयमाला पथाजी देवकर यांनी त्यांच्या शेतात असलेल्या विहीरीच्या पाण्यात उडी मारुन आत्महत्त्या केली असल्याची विश्वसनीय माहिती शहर पोलिसांकडुन प्राप्त झाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी खबर देणारे इसम विलास सुखदेव जाधव (वय-५३) रा.शिरसगाव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की,”मयत योगेश जाधव हा आपल्या राहत्या घरी दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

दरम्यान मिळालेल्या माहिती नुसार सदर मयत तरुण योगेश जाधव हा आपला पारंपरिक शेती आणि दुग्ध व्यवसाय करत होता.त्याचे काही वर्षांपूर्वी लग्नही झालेले होते.मात्र काही कारणाने त्याची पत्नी त्यास सोडून माहेरी गेलेली होती.त्यातून तो मानसिक तणावात होता.घरी आई,वडील आणि लहान भाऊ असे अन्य सदस्य होते.दि.१८ जानेवारी रात्री ते दि.१९ जानेवारी रोजी सकाळी ०९ वाजे पूर्वी कधीतरी त्याने आपल्या घरी छताला गळफास घेऊन आपली जीवन यात्रा संपवला असल्याचे सकाळी त्यांच्या घरच्या अन्य व्यक्तींच्या लक्षात आले आहे.त्यामुळे त्यांच्यात खळबळ उडाली आहे.

दरम्यान या प्रकरणी खबर देणार विलास जाधव यांनी या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.घटनास्थळी पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक चंद्रकांत काळे यांनी भेट दिली आहे.

या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात धाव घेऊन अकस्मात मृत्यू नोंद क्रं.०४/२०२३ सी.आर.पी.सी.१७४ प्रमाणे दप्तरी नोंद दाखल केली.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक काळे हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close