जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
आरोग्य

..या ठिकाणी रक्तदान शिबिर उत्साहात संपन्न

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीने साईआश्रम ०१ (०१ हजार रुम) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या रक्‍तदान शिबीराचा शुभारंभ संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी प्रथम रक्‍तदान करुन केला आहे.त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

वर्तमानात टाळेबंदी हळू हळू हटविण्‍यात येत असून जनजीवन पुर्वपदावर येत आहे.त्‍यामुळे दैनंदिन रुग्‍णांकरीता अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया व तातडीचे शस्‍त्रक्रिया करीता रक्‍ताची टंचाई भासत चालेली आहे.तसेच रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ व पवित्र दान असल्‍याने संस्‍थानच्‍या वतीने साईआश्रम ०१ येथे सकाळी ०९.०० ते सायं.०५.०० यावेळेत रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले होते.

कोरोना विषाणु (कोवीड १९) ची साथ चालु असून कोरोना विषाणुच्‍या संकटामुळे प्रतिबंधात्‍मक उपाययोजना म्‍हणून शासनाच्‍या वतीने दिनांक १७ मार्च पासुन टाळेबंदी करण्‍यात आलेली होती.वर्तमानात टाळेबंदी हळू हळू हटविण्‍यात येत असून जनजीवन पुर्वपदावर येत आहे.त्‍यामुळे दैनंदिन रुग्‍णांकरीता अथवा प्‍लॅन शस्‍त्रक्रिया व तातडीचे शस्‍त्रक्रिया करीता रक्‍ताची टंचाई भासत चालेली आहे.तसेच रक्‍तदान हे सर्वश्रेष्‍ठ व पवित्र दान असल्‍याने संस्‍थानच्‍या वतीने साईआश्रम ०१ येथे सकाळी ०९.०० ते सायं.०५.०० यावेळेत रक्‍तदान शिबीराचे आयोजन करण्‍यात आलेले होते.या शिबीरात स्‍वतः संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी रक्‍तदान करुन या शिबीराचा शुभारंभ केला.

याप्रसंगी संस्‍थानचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, दिलीप उगले, वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे व वैद्यकीय अधि‍क्षीका डॉ.मैथिली पितांबरे आदी उपस्थित होते.
या रक्‍तदान शिबीरात शिर्डी ग्रामस्‍थ,साईभक्‍त,संस्‍थानच्‍या विविध विभागांचे विभाग प्रमुख व कर्मचारी अशा ११८ रक्‍तदान करणा-या रक्‍तदात्‍यांना संस्‍थानच्‍या वतीने प्रमाणपत्र, ब्‍लड डोनरकार्ड देऊन प्रोत्‍साहन म्‍हणुन श्री साईबाबांची थ्रीडी प्रतिमा व उदी देण्‍यात आली.
सदर शिबीर यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी रुग्‍णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ.विजय नरोडे,वैद्यकीय अधि‍क्षीका डॉ.मैथिली पितांबरे व रुग्‍णालयाचे परिचारीका व परिचारक आणि कर्मचा-यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close