सामाजिक उपक्रम
लहानुभाऊ नागरे यांची जयंती उत्साहात साजरी

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपेरगाव तालुक्यातील शैक्षणिक अद्यप्रवर्तक स्व.गणपतराव विठोबा नागरे नागरे यांच्या ८३ व्या जयंतीनिमित्त-रेनबो इंटरनॅशनल स्कूल येथे रेनबो स्कूलचे संस्थापक लहानुभाऊ नागरे आणि कांतीलाल शेठ अग्रवाल यांच्या तैलचित्रांचा अनावरण सोहळा संगमनेरच्या नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे माजी नगराध्यक्ष पद्माकांत कुदळे यांचे शुभहस्ते मोठ्या उत्साहात पार पडला आहे.
उद्योजक कंतीलाल अग्रवाल,संजय नागरे,मनोज अग्रवाल,आनंद दगडे यांनी उदघाटक दुर्गाताई तांबे व पद्माकांत कुदळे यांचे स्वागत केले आहे.
लहानुभाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून दुर्गाताई तांबे यांनी अतिशय भावनिक ओघवत्या शैलीत अण्णांच्या आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरतांच्या गत स्मृतींना उजाळा देत या ना.बाळासाहेब थोरात,आ.सुधीर तांबे व अण्णांच्या मधील ऋणानुबंधाचा मागोवा घेतला.ज्या ज्या वेळेस मी कोपेरगावला आले त्यावेळेस अण्णांनी मला साडी आणि भोजन केल्याशिवाय कधीही रिकाम्या हाताने पाठविले नाही हे सांगताना त्यांना गहिवरून आले होते.
पद्माकांत कुदळे यांनी नागरे यांच्या आठवणी सांगितल्या.शिक्षणाची गंगा प्रथम त्यांनी या तालुक्यात आणली व तिचा वटवृक्ष केला त्यांच्या स्मृतीतून जाणे शक्यच नाही असे मनोगत व्यक्त केले.
सुरक्षित अंतराचे नियम पाळून शिक्षणमहर्षी लहानुभाऊ नागरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष व रेनबो स्कूलचे कार्यकारी मानद सदस्य आकाश नागरे यांनी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात,ना.बाळासाहेब थोरात,कांतीलाल अग्रवाल शेठ आणि नागरे यांचे चौथ्या पिढी पर्यंत च्या “ऋणानुबंध” या विषयावर प्रकाशझोत टाकून उपस्थित पाहुण्यांचे आभार मानले.या प्रसंगी गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.सूत्रसंचलन दत्ता डोखे व कैलास ढमाले यांनी केले आहे.