कृषी विभाग
..या बाजार समितीत कांद्याची आवक वाढली

जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात व तीलवणी उपबाजारात आज कांद्याची विक्रमी ६ हजार क्विंटल कांद्याची आवक झाली असून पहिल्या प्रतीच्या कांद्याला ४ हजार ते ४ हजार ५०० असा दर मिळाला आहे.तर दुसऱ्या प्रतीच्या कांद्याला ३ हजार ते ३ हजार ५०० असा दर मिळाला असल्याची माहिती बाजार समितीचे सभापती संभाजी रक्ताटे यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
वर्तमानात शेतकऱ्यांचा रब्बी पिकांची उभारणी करण्याची वेळ असल्याने कांद्याला प्रतिक्विंटल भाव कमी झाला असला तरी शेतकऱ्यांना आपला शेतमाल उभारण्याची घाई असल्याने त्यांना आता आपला शेतमाल काही करून विकणे क्रमप्राप्त आहे.तालुक्यात आतापर्यंत जवळपास सत्तावीस टक्के रब्बीच्या शेतमालाची उभारणी झाली आहे.उर्वरित काळात चालू वर्षी चांगला पाऊस असल्याने शेतकऱ्यांना आता रब्बीची भ्रांत लागली आहे.
वर्तमानात शेतकऱ्यांचा रब्बी पिकांची उभारणी करण्याची वेळ असल्याने कांद्याला प्रतिक्विंटल भाव कमी झाला असला तरी शेतकऱ्यांना आपला शेतमाल उभारण्याची घाई असल्याने त्यांना आता आपला शेतमाल काही करून विकणे क्रमप्राप्त आहे.तालुक्यात आतापर्यंत जवळपास सत्तावीस टक्के रब्बीच्या शेतमालाची उभारणी झाली आहे.उर्वरित काळात चालू वर्षी चांगला पाऊस असल्याने शेतकऱ्यांना आता रब्बीची भ्रांत लागली आहे.त्यामुळे आता रोख चलनाचे पीक म्हणून त्यानां आता कांदा हे पिकच साथ देत असल्याने त्यांनी आपला कांदा थेट बाजारात उतरवला आहे.याचाच परिणाम म्हणून हि कांदा वाढ बाजारात आल्याचे म्हटले जात आहे.
कोपरगावात आज दिवसभरात सहाशे साधनांची आवक झाली आहे.त्यात शिरसगाव येथील उपबाजारात तब्बल पाचशे वाहनांची आवक झाली आहे.तेथे कांद्याला किमान व कमाल दर पुढील प्रमाणे आहे.पहिल्या प्रतीचा कांदा ०३ हजार ८०० ते ०४ हजार तर दुय्यम प्रतीचा कांदा हा ०३ हजार १०० ते ०३ हजार ते ७५० तर ट्रूतीय प्रतीचा कांदा हा ०१ हजार ते ०२ हजार ६०० असा आहे.याखेरीज वर्तमानात नगर-नाशिक जिल्ह्यात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने परतीच्या पावसाची भीती हि शेतकऱ्यास हा कांदा आणावयास भाग पाडत आहे.या खेरीज हा कांदा साठविण्याची सोय नसल्याने ही तो बाजारात आणावा लागत आहे.